You are currently viewing वैकुंठ पाहुनी आलो.

वैकुंठ पाहुनी आलो.

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे ज्येष्ठ लेखक कवी माधव ग.सातपुते (विगसा) लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वैकुंठ पाहुनी आलो.*

✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

 

मी वैंकुठ पाहुनी आलो

भेटले सारे हरवलेले

जीव तुमच्यात अडकलेला

सर्वा सोडुनी परतुनी आलो.

 

नकळले काय असे घडले

निर्विकार सरस्वती चंद्रभागा

साक्षात अस्तित्व लयास गेले

मीच , स्वतःस विसरुनी गेलो

 

तुमचाच लळा जिव्हाळा

स्पंदनातुनी विर्घळलेला

झणी अमृत शिंपुनी गेला

मी चिद्रनिद्रेतुनी जागा झालो

क्षण केवळ जणु भ्रमनिरासी

सामोरी कृपाळू चक्रपाणी

जो जीवात्म्यास जगविणारा

त्याच्या स्मरणात हरवून गेलो

 

स्वर्गस्वर्ग तो दूजा कुठला

नाते निष्पाप वात्सल्याचे

निर्मल मैत्र स्पर्श भावनांचे

सत्यास मी कवटाळीत राहिलो

 

*( जानेवारी 2023 मधील पहिली रचना 1 मार्च 2023)*

*वि.ग.सातपुते. (भावकवी )*

*📞: 9766544908*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =