You are currently viewing माणगावमध्ये एसटी कंट्रोल पॉईंट करा – युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांची मागणी

माणगावमध्ये एसटी कंट्रोल पॉईंट करा – युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांची मागणी

कुडाळ

माणगाव हा ग्रामीण भाग आहे,आणि माणगांव खोऱ्यात २७ ते २८ गाव आहेत आणि या भागात एसटी सेवा सुरळीत झाली पाहिजे त्यासाठी माणगाव मध्ये एसटी कंट्रोल पॉईंट करण्याची विंनती योगेश धुरी यांनी केली आहे.माणगाव ला इतर ग्रामीण गाव जोडले गेले पाहिजेत.
तसेच सावंतवाडी ते माणगाव,कुडाळ ते माणगाव आणि नंतर माणगाव मधून इतर गावापर्यंत वेगळी बस व्यवस्था झाल्यास एसटी चे उत्पन्नात वाढ होईल अशी सूचना विभाग नियंत्रकांना देण्यात आली.
माणगाव हे इतर २६ ते २७ गावाचे मुख्य केंद्र झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वसन विभाग नियंत्रक श्री अभिजित पाटिल यांनी दिले.
तसेच माणगाव मध्ये एसटी कंट्रोल पॉईंट म्हणजेच मिनी एसटी बस स्टँड साठी प्रयत्न करावेत अशी मागणी योगेश धुरी यांनी विभाग नियंत्रक श्री अभिजित पाटिल यांच्याकडे केली, तसेच हल्लीच हजर झालेले नवीन विभाग नियंत्रक श्री अभिजित पाटील यांच स्वागत श्री अनुप नाईक यांनी केले,यावेळी युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,हुमरस माजी सरपंच अनुप नाईक,हुमरस उपसरपंच श्री संतोष परब,जिल्हा सचिव श्री आबा धुरी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 3 =