You are currently viewing मुसळधार पावसामुळे न्हावेली-रेवटेवाडी पूल पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे न्हावेली-रेवटेवाडी पूल पाण्याखाली

सावंतवाडी

सोमवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या दमदार पावसामुळे शेतीला नद्यांचे रूप आले. सलग दहा ते बारा तास पडत असलेल्या मुसळधार पावसाने बांदा-शिरोडा मार्गावरील न्हावेली रेवटेवाडी पूल पाण्याखाली गेले. सुमारे दोन तास गुडघाभर पाणी आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. मात्र कोणतीही विपरीत घटना घडू नये म्हणून रेवटेवाडी व पाडलोस केणीवाडा ग्रामस्थांनी वेळीच वाहनचालकांना रोखत सतर्कता दाखवली.

बांदा-शिरोडा मार्गावरील न्हावेली रेवटेवाडी येथील पुलावर पाडलोससह आरोस, न्हावेली भागातील पाणी येते. सकाळपासूनच दमदार सुरू झालेल्या पावसामुळे भातशेतीला नद्यांचे रूप आले. काही ठिकाणी लावणी केलेले भात वाहून गेले तर नांगरणीसाठी आणलेल्या ट्रॅक्टर पाण्यातच उभ्या असलेला दिसून आला. सदर मार्गावर पुलाच्या दोन्ही बाजूला ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत वाहनचालकांना थांबवले. कोणतीही विपरित हानी घडू नये म्हणून दाखवलेल्या तत्परतेबद्दल जाणकारांमधून ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.

या लवेळी पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश उर्फ भाऊ कुबल, सामाजिक कार्यकर्ते सुनील परब, तसेच ग्रामस्थ अमोल नाईक, मनोज परब, भैया नाईक, सदा नाईक, अक्षय जाधव, सुनील नाईक, सप्रेम परब, सचिन नाईक, बाबल परब, अरुण परब आदींनी वाहनचालकांना सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =