You are currently viewing माजगाव केंद्र शाळा १ मध्ये आजपासून श्रमसंस्कार शिबिर

माजगाव केंद्र शाळा १ मध्ये आजपासून श्रमसंस्कार शिबिर

सायंकाळी राजेसाहेब श्रीसंत खेमसावंत भोसले, सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांच्याहस्ते होणार उद्घाटन..

सावंतवाडी

माजगाव ग्रामपंचायत व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने 21 ते 27 पर्यंत 7 दिवस निवासी श्रीमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर माजगाव जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर १ येथे आयोजित करण्यात आले असून या शिबिराचे उद्घाटन आज सायंकाळी राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले व सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांच्या हस्ते होणारे आहे.

यावेळी राणीसाहेब सौ. सुभदादेवी खेमसावंत भोसले, श्री.युवराज लखमसावंत भोसले, माजगाव सरपंच अर्चना सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत आदी उपस्थिती राहणार आहेत.

या शिबिराच्या अनुषंगाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत युवकांचा ध्यास, ग्राम, ग्रामसेवक या उद्देशानुसार स्वच्छ भारत अभियान सार्वजनिक आरोग्य पर्यावरण, संवर्धन, वीज बचत, जलसंवर्धन, बंधारा, या विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + seven =