You are currently viewing दाणोलीच्या सौ.दिपा सुकी यांना जिल्हा आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्कार

दाणोलीच्या सौ.दिपा सुकी यांना जिल्हा आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्कार

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय सेवक या पुरस्कारासाठी दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ दिपा दिलीपसुकी यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांनी याबाबत सौ दिपा दळवी यांना कळविले आहे.सौ. दिपा सुकी यांच्या आजपर्यंतच्या 23 वर्षातील ग्रंथालय चळवळीतील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असुन गोवेरी येथील ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथ संग्रहालयात रविवारी १९ मार्च रोजी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 3 =