You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगणक शिक्षक बेपत्ता

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगणक शिक्षक बेपत्ता

कुडाळ :

 

वाडीवरवडे-भिमाईनगर येथील रहिवासी, संगणक शिक्षक नीतेश प्रकाश जाधव (३४) हे शनिवारपासून कुडाळ येथून बेपत्ता झाले आहेत. याबाबतची तक्रार त्यांचे वडील प्रकाश जाधव यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली आहे. गेल्या चार महिन्यांपासून नीतेश जाधव हे ओरोस येथील ज्ञानकुंज कॉलेज येथे शिक्षक म्हणून तात्पुरत्या स्वरुपात नोकरीला आहेत. नेहमीप्रमाणे ते २ जुलै रोजी सकाळी ९ वाजता प्लेजर मोटारसायकलने कॉलेजला गेले होते. परंतु सायंकाळी ५.३० वाजले, तरीही ते घरी परतले नाहीत. म्हणून त्यांचे वडील प्रकाश यांनी नितेश यांच्याकडील दोन्ही मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर मिळत होते. त्यामुळे त्यांनी ६.३० वाजण्याच्या सुमारास ज्ञानकुंज कॉलेज येथे जाऊन कॉलेजचे अध्यक्षांशी मोबाईलवर संपर्क साधला. अध्यक्ष यांनी नितेश दुपारी ३.३० च्या सुमारास कुडाळ येथे गेल्याचे सांगितले. त्यानुसार नितेश यांचे वडील प्रकाश तिथून कुडाळला येत असताना त्यांना काळप नाका येथे नितेश वापरत असलेली प्लेजर मोटरसायकल उभी करून ठेवलेली दिसली. यावरून त्यांनी नितेश बेपत्ता असल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 12 =