You are currently viewing “तालविश्व” संगीत विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचे पखवाज विशारद परीक्षेत यश…

“तालविश्व” संगीत विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचे पखवाज विशारद परीक्षेत यश…

वेंगुर्ले

तालविश्व संगीत विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गंधर्व मंडळाच्या पखवाज परीक्षेत यशस्वीरित्या विशारद पदवी संपादन केली. आरोस येथील कु. सचिन पांगम व तुळस येथील कु. आकाश कांचन साळगावकर यांनी हे यश मिळविले आहे. या वादकांना तालविश्व संगीत विद्यालयचे संचालक मनिष तांबोसकर व चिंतामणी संगीत विद्यालयाचे संचालक निलेश पेडणेकर यांचेही मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
आकाश याने लहानपणा पासुनच पखवाज वादनाचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. व त्याच्या घरातच भजन परंपरेचा वारसा होता. आकाशने विविध तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय भजन स्पर्धांमधून प्रथम द्वितीय अशी अनेक बक्षिसे मिळवून तसेच शास्त्रीय पखवाज वादन स्पर्धांमधून आपल्या वादनाचा ठसा उमटविला आहे.
तसेच सचिन पांगम याने सुद्धा लहानपणा पासुन पखवाज वादनाचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. सचिनच्या घरात भजन परंपरेचा वारसा होताच त्यातून त्याला आवड निर्माण झाली. विविध तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय भजन स्पर्धांमध्ये पखवाज वादनात प्रथम द्वितीय अशी अनेक बक्षिसे मिळवून तसेच शास्त्रीय पखवाज वादन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन वादनाची कला जोपासली आहे .
दोघे गुणी वादक नामवंत भजनी बुवांना भजनस्पर्धांमध्ये व कार्यक्रमात पखवाजाची साथसंगत करून नावलौकिक मिळवित आहेत. तसेच पखवाज जुगलबंदी, सोलो अशा शास्त्रोक्त पखवाज वादनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत आहेत. दरम्यान आई-वडिल, संपुर्ण कुटुंब, गुरुबंधू , मित्रपरिवार यांच्या प्रोत्साहाने व आशीर्वाद या मुळेच आम्ही हे यश संपादन करू शकलो, असे मत या दोघांनी व्यक्त केले.
श्री चिंतामणी संगीत विद्यालयाचे संचालक गुरु श्री. निलेश पेडणेकर, माऊली संगीत विद्यालयाचे संचालक श्री. वैभव परब व श्री सद्गुरु संगीत विद्यालयाचे संचालक श्री. दिप्तेश मेस्त्री यांनी दोघांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =