You are currently viewing प्रिया—मुकुल

प्रिया—मुकुल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

🌷🌷🙏 *प्रिया—मुकुल*🙏🌷🌷

फेकीत मुलायम वातावरणी प्रेम
ही ठुमकत चाले चाले सुंदर धून
मधुनीच वळूनी बघे , हसे हळुवार
करी नयनामधुनी काय अचानक खूण ! ॥१॥

कधी कुरळ्या काळ्या केसांची ठेवण
कधी गुंफी पुष्पे गगनातून मदन
कधी जर्द जांभळी पोत मधे जरतार
प्रमदेचे मादक वस्त्र धरीतसे मौन ॥२॥

मार्गावर वळुनी बघत तृणाची पाती
पर्णावर सुमने उंचुनी माना बघती
कुजबुजती झुडुपे लाजती नव वेली
जग गुलाम सारे या सम्राज्ञी पुढती ॥३॥

चालली पुढे ती काय ऐट ! आनंद !
प्रेमाचा ओहळ ओघळतो जणु मन्द !
बनविली सुराने काया वा कनकाची !
चालली प्रियाचा शोध घेत ती धुंद ! ॥४॥

वा करीत असता गजाननाची मूर्ती
किणकिणती कंकण , कर्णभूषणे डुलती
भरभरा काढता घर्म कणांचे घोस
ती माळ तुटूनी पडला भूवर मोती ! ॥५॥

चालली पुढे ती लचकत मुरडत मान
अवतरे मूर्तिमन् मल्हारातिल तान
चांचल्य विजेचे , लाटेचे खळखळणे !
चालली अर्पिण्या श्रद्धा आणिक प्रेम ! ॥६॥

हा थांब !— कुणाची उसामधे चाहूल ,
अंगावर रंगीत शर्ट कुणाचा लाल
आरक्त ओठ ते काया बांधेसूद
ग प्रियकर आला ! आला देख मुकुल !! ॥७॥

थबकलीच जागी प्रिया घेवुनी वळसा
तो समोर येता सोडुनी अन् आडोसा
भूमीवर उचलुन मागे मंद पदातील
घे चाळ वाजवुनी हृदयाचा कानोसा ॥८॥

पडलीच मिठी की मदनाचा तो पाश
श्वासात मिळाले शंभर शंभर श्वास
स्वच्छंदी झाल्या केशर ओल्या नजरा
कक्षेत धावल्या शेतामधे कडेस ॥९॥

रण कसले तेथे लोळे प्रेम जळात
पळुनी बसती उठती अति वेगात
जणु अमरत्वाला मिठी मारण्या
मदनकरांना मिळे रतीचा हात !! ॥१०॥

क्षणि हवेत विरली सनईचीच लकेर
दशदिशातुनी जुळले ते मांगल्याचे स्वर
परि नेत्र कुणाचे खिळले त्यांच्यावरती
वार्‍यापरि गेली वार्ता तेथुन दूर ॥११॥

ती भेट सरे प्रेमाचे ओघळ जाती
हर्षाने न्हाती त्यात तृणाची पाती
परि ठसे पदांचे अजून असती तेथे
जग जाते तेथे जोडुन मंगल नाती ॥१२॥

✍️©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०

प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
*9975892602*

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*
————————————————

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =