You are currently viewing जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरुण वि. देशपांडे लिखित श्री गोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली -पुष्प-११ वे

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरुण वि. देशपांडे लिखित श्री गोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली -पुष्प-११ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरुण वि. देशपांडे लिखित श्री गोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली -पुष्प-११ वे*

—————————————-

सद्गुरुंच्या शोधाची तळमळ अंतरी

ओढ भेटीची ती मनात खोल खरी ।।

 

श्रीमहाराज साधू-सत्पुरुषांना भेटती

अध्यात्मिक अधिकारी ना भेटे कुणी

आशीर्वाद देती साधू- साधक हे सारे

श्रीमहाराजांना पुढे जाण्यास सांगती ।।

 

कृष्णा-वारणा संगमाकाठीच्या गावी

हरिपुरात त्यांना साध्वी राधाबाई भेटली

जा मिरजेला, अन भेटा अण्णाबुवाना

साध्वीने सूचना श्रीमहाराजांना केली ।।

 

मिरजेस भेट दोघांची जाहली खरी

आशीर्वादही अण्णाबुवांनी तो दिला

परमात्मा तुझे कल्याण करील ”

आशीर्वाद घेऊन हो महाराज निघाले

सटाणे गावच्या देव-मामलेदाराकडे आले ।।

 

या ठिकाणी श्रीमहाराज बरेच राहिले

देव- मामलेदार एक दिवस मग म्हणाले

“अनुग्रह देण्याचा माझा अधिकार नाही

निरोप त्यांचा घेउनी श्रीमहाराज निघाले ।।

 

अक्षर-सेवा माझी गुरुराया गोड मानावी

कवी अरूणदासा लेखन प्रेरणा द्यावी ।।

——- —————————–

कवी- अरुणदास- अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342

—————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + fourteen =