You are currently viewing राजमाता

राजमाता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यांजली*

 

*राजमाता*

 

स्वर्णकळी उमलली

तेजस्वी जशी सौदामिनी

लखुजींच्या अंगणी

जिजाऊमाता!!

 

संस्कारांचे बळ

घेऊन आली मानिनी

शहाजींची अर्धांगिनी

दैदिप्यमान!!

 

यवनांचे हल्ले

काळजी रयतेची वाहिली

शिवबात पेरली

स्वातंत्र्यबीजे!!

 

पराक्रमी पुत्र

तोरण शिवबाने बांधले

स्वराज्याचे साकारले

स्वप्न!!

 

डगमगली नाही

ती तेजस्वी नारी

दिली उभारी

शिवराजास!!

 

धन्य जिजाऊ

असा पुत्र घडवला

रयतेचा झाला

राजा!!

 

〰️〰️〰️🍃🌷🍃〰️

अरूणा दुद्दलवार🙏✒️

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =