You are currently viewing विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची शतकाकडे वाटचाल……..

विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची शतकाकडे वाटचाल……..

*विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची शतकाकडे वाटचाल……..*
==============
*१९८० च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी घेतला मेळावा…….*
=≠============
अमरावती

स्थानिक शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील म्हणजे यापूर्वीच्या विदर्भ महाविद्यालयातील १९८० या वर्षीच्या बॅच मधील बीएससी पदवीधर माजी विद्यार्थ्यांचा मेळावा सुप्रसिद्ध आरटीओ अधिकारी श्री शरद जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली व माजी ए आर टी ओ श्री ज्ञानदेव मोडक यांच्या पुढाकाराने अमरावती येथे संपन्न झाला.
विदर्भ महाविद्यालयाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीचे माजी पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी वनराज्यमंत्री श्री जगदीश गुप्ता व मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .बडनेरा रोडवरील श्री मोडक यांच्या फार्म हाऊसमध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये विदर्भ महाविद्यालयात शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर काम करीत आहेत. त्यापैकीच १९८० च्या बॅच मधील बीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे मुख्य वनसंरक्षक श्री रवींद्र वानखडे,विद्यापीठाचे ग्रंथपाल श्री मोहन खेरडे बांबू गार्डन व ऑक्सिजन पार्कचे निर्माते श्री अशोक कविटकर,उप जिल्हाधिकारी श्री मोहन पातुरकर उपजिल्हाधिकारी श्री विनोद शिरभाते,प्राचार्य हरिदास भुस्कट, प्रा.डाँ. मनोहर येऊल, मुख्याध्यापक श्री दिव्यानंद माथने, उद्योजक श्री परमानन्द मोटवानी,शेतकरी श्री दिलीप सिंह नहाटा, पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर श्री मनोहर वासनकर, प्रा. एन बी राऊत,प्राचार्य भास्करराव शिंगणे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री मिलिंद तोरो, प्रा. दिलीप देशमुख,डॉ. विनोद पाटील, श्री सुरेंद्र ठाकरे,उद्योजक श्री महेश सोमानी,श्री किशोर संपळे, आशोक दोशी,श्री विनोद रुमाले, मातोश्री वृद्धाश्रमाचे श्री राजेंद्र राऊत व संगीता राऊत व सुरेश कनोजिया हे सहभागी झाले होते. जवळपास ४३ वर्षानंतर विदर्भ महाविद्यालयात शिकणारे हे विद्यार्थी एकत्र आले होते.
पुणे, मुंबई, नागपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम,बुलढाणा, अमरावती व इतरत्र कार्यरत असणारे या बॅचच्या विद्यार्थ्यांना एकत्र येण्यासाठी श्री ज्ञानदेव मोडक यांनी पुढाकार घेतला. या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली. दर सहा महिन्यानंतर अशा प्रकारचा विदर्भ महा विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात यावा असा प्रस्ताव याप्रसंगी मांडण्यात आला . याप्रसंगी सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणाऱ्या श्री ज्ञानदेव मोडक यांचा मिशन आय ए एस तर्फे सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला .यानंतरचे स्नेह मिलन माजी वनमंत्री श्री जगदीश गुप्ता यांच्या फार्म हाऊस वर संपन्न होणार आहे कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली. ४३ वर्षानंतर विदर्भ महाविद्यालयातील बीएससी चे विद्यार्थी एकत्र आल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. जुन्या आठवणी, कॉलेजमधील गमती जमती आणि गप्पांना उधाण आले होते .अशाच प्रकारचे मेळावे विदर्भ महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या वेगवेगळ्या बँचच्या विद्यार्थ्यांनी विदर्भ महाविद्यालयाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करावे अशा प्रकारचे मनोगत या मेळाव्यात सहभागी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
………………………
प्रकाशनार्थ
प्रा *.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक* Mission IAS अमरावती 9890967003

*संवाद मीडिया*

*👮‍♂️!! खुशखबर! खुशखबर!!👮‍♂️*

*👮‍♂️भारतीय सैन्यदलात (आर्मी, नेवी, एअर फोर्स) अधिकारी होण्याची नामी संधी.*👮‍♀️

*_सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे 15 दिवसांचे निवासी NDA प्रवेश परीक्षा व SSB interview मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे._*

*_🔸सदर शिबिर १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२३ या कालावधीत इ. ११वी व १२वी (विज्ञान) झालेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. सदर प्रशिक्षण शिबिर निवासी असून यामध्ये प्रामुख्याने NDA लेखी परीक्षेचे सखोल मार्गदर्शन व SSB मुलाखत प्रशिक्षण, साहसी खेळ, obstacle training, स्वयं सुरक्षा, रायफल शूटिंग व personality development तसेच सर्व प्रकारचे खेळ यांचा समावेश आहे._*

*_👇खालील लिंक वर क्लिक करून  संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा_*

https://forms.gle/xxSJxjZSbXXao8hc9

*अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.*

*📲राजेंद्र गावडे : 9403366229*

*📲 नागेश पांढरे : 9422073840*

*📲Office : 9420195518, 7822942081*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + twenty =