You are currently viewing शिरंगे पुनर्वसनमध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..

शिरंगे पुनर्वसनमध्ये शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..

पारंपारिक घोडेमोडणी उत्सवाने कार्यक्रमाची सांगता

दोडामार्ग

शिरंगे पुनर्वसन हे पुनर्वसीत गाव असून पुनर्वसन झाल्यानंतर श्रीदेवी सातेरी भावई ची स्थापना करून आज १५ वर्षे पूर्ण झाली असता प्रत्येक उत्सव अगदी उत्साहात साजरा होणारी देवी आणि नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ओळख आहे. यातच शिमगोत्सव सध्या मोठ्या उत्साहात सुरू आहे,श्रीदेवी सातेरी चा शिमगोत्सव हा पाच दिवसांचा असतो पहिल्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात होळी आणत होळी घालुन होळीचे पूजन केले जाते तर दुसऱ्या दिवशी चोर व तिसऱ्या दिवशी होड म्हणजेच देवाच्या रूपात बालकांना नटवून आशीर्वाद देण्यासाठी प्रत्येक घरात फिरवले जाते आणि त्यांची पूजा केली जाते तर चौथ्या दिवशी रोंबाट म्हणजेच धुळवड खेळली जाते ती देखील अगदी मोठ्या उत्साहाने प्रत्येक जण आपल्या डोक्यावरील ताण- तणाव बाजूला ठेवत या धुळवटमध्ये मिसळून आनंदी-आनंद साजरा करत असतो त्यानंतर त्याच दिवशी रात्री देव लिंग महादेवाच्या दर्शनाला जातो आणि पाचव्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी देवीच्या आशीर्वाद रुपी न्हावान दिले जाते हा आशीर्वाद वर्षभर पुरेल असा असतो.

त्याच दिवशी संध्याकाळी घोडेमोडणी खेळली जाते घोडेमोडणी म्हणजे शिरंगे पुनर्वसन मधील श्रीदेवी सातेरी च्या घोडेमोडणी उत्सवात दोन घोड्यांचा समावेश केला जातो म्हणजेच घोड्यांच्या रुपी माणसाला नटवून दोन घोड्यांचा समावेश करत ही घोडेमोडनी खेळवली जाते असा पाच दिवसाचा शिमगोत्सव हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो कितीही ताण-तणाव असला तरी प्रत्येक जण अगदी उत्साहात पाचही दिवस साजरे करतात आणि वर्षभरासाठी आशीर्वाद मिळवतात.
कोकण म्हटले की अशा अनेक उत्साहांचा समावेश असतो आणि बाहेरगावी असलेला चाकरमानी देखील कोकणात या उत्साहांसाठी अतिशय उत्साहात वेळात वेळ काढून येत असतो आणि वर्षभरासाठी आशीर्वाद मिळवत असतो असा हा शिरंगे पुनर्वसन मधील पाच दिवसाचा शिमगोत्सव उत्साहात साजरा केला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =