You are currently viewing शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

विविध विषयावर केली चर्चा !

सिंधुदुर्ग

राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय नामदार दीपकभाई केसरकर साहेब शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांची त्यांच्या रामटेक या निवासस्थानी राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात भेट देऊन चर्चा करण्यात केेली.

संघटनेच्या वतीने शिक्षण परिषद आयोजित करण्यासंदर्भात चर्चा करून जानेवारी 2023 मध्ये कोल्हापूर किंवा सिंधुदुर्ग यापैकी एका जिल्ह्यात शिक्षण परिषद घेण्यासाठी संघटनेला भेटीचा वेळ देतो असे सांगितले आहे .तसेच इतर सर्व मागण्यांकरिता पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये चर्चे करिता संघटनेला निमंत्रित करण्यात येईल असे आश्वासित केलेले आहे.

यावेळी शिक्षण संचालक माध्यामिक महाराष्ट्र राज्य मा . पाटील साहेब यांचीही भेट झाली . राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ओळख पत्र देण्याबाबत सर्व माहिती घेऊन कार्यवाही सुरु करू असे त्यांनी सांगितले .

याप्रसंगी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर ,राज्य कार्याध्यक्ष -दशरथ शिंगारे ,राज्य संपर्कप्रमुख प्रदीप शिंदे ,राज्य सहसचिव माधव वायचाळ ,राज्य प्रवक्ता सुनील गुरव ,राज्य महिला प्रतिनिधी चंदाराणी कुसेकर ‘पुणे जिल्हाध्यक्ष -भीमराव शिंदे , ठाणे जिल्हाध्यक्ष विजयकुमार देसले , कोल्हापूर सरचिटणीस नवनाथ व्हरकट ,कोकण विभाग कार्याध्यक्ष आनंद जाधव, व हिंगोली जिल्हा प्रतिनिधी भूषण घोलप आदी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + five =