You are currently viewing कळसुलीत मधमाश्यांच्या हल्ल्यात गावडेवाडी शाळेतील ८ विद्यार्थी सह २ शिक्षक जखमी…

कळसुलीत मधमाश्यांच्या हल्ल्यात गावडेवाडी शाळेतील ८ विद्यार्थी सह २ शिक्षक जखमी…

कणकवली

कळसुली गावडेवाडी जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गात घुसून आघ्या मधमाश्यांनी ९ ;३०च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात ८ विद्यार्थी सह २ शिक्षक जखमी झाले आहेत. कळसुली गावडेवाडी नदीच्या दिशेने आलेल्य १०० हुन माशांनी शाळेच्या आवारात खेळत असलेल्या २ मुलांच्या मागून येत वर्गात घुसले, व वर्गात घुसून ८ विद्यार्थ्यांसहीत २ शिक्षकांवर मधमाश्यांनी हल्ला केला.

मधमाश्यांनी हल्ला केलेल्या गावडेवाडी शाळेतील विद्यार्थी जखमी अवस्थेत आहेत. यांची माहिती रुजाय फर्नांडिस यांनी डॉ. पोळ यांना मोबाईलद्वारे संपर्क करून माहिती दिली असता, कळसुली प्रा. आरोग्य केंद्रातील १०२ अँबुलन्सच्या सहाय्याने कळसुली प्रा.आरोग्य केंद्रात उपचारासाठी या विद्यार्थ्यांना आणण्यात आले. ऐकून १२ पैकी ८ विद्यार्थी उपस्थित होते. या ८ ही विद्यार्थ्यांसह २ शिक्षकावर हल्ला केला. या सर्व विद्यार्थ्यांनवर कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती मुख्याध्यापक सौ. तन्वी आपटे यांनी दिली.

कळसुली जि. प. शाळेतील विद्यार्थी रिद्धी सावंत, निधी सावंत, वक्रतुंड प्रभू, रोशन पाडावे, सानिका राऊत, सानिका देसाई, मयूर राणे,मानवी पाडावे सर्व विद्यार्थ्यां ८ ते ९ वयोगटातील असून,कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असताना असून ३ विद्यार्थ्यांना उलटी झाली असून, अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ. पोळ यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस ,सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी, माझी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर चव्हाण, संतोष सुतार, प्रकाश दळवी, गणेश पाडावे, एकनाथ दळवी, कोमल राऊत, रेश्मा प्रभू,किशोर राऊत,राजेश्री पाडावे, प्रतिक्षा सावंत, प्रियकां देसाई, सचिन झाटे पालक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा