You are currently viewing सिंधुदुर्ग सायबर सेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ७० हजार विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती – अमित गोते

सिंधुदुर्ग सायबर सेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ७० हजार विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती – अमित गोते

सिंधुदुर्ग सायबर सेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ७० हजार विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती – अमित गोते

महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून अधिकार्‍यांचा सत्कार

सावंतवाडी

राज्यात सर्वच ठिकाणी सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना सिंधुदुर्गात मात्र या गुन्ह्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. सिंधुदुर्ग सायबर सेलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ७० हजार विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आल्यामुळेच ही संख्या घटली, असा दावा सिंधुदुर्ग सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमित गोते यांनी आज येथे केला. दरम्यान या ठिकाणी जिल्ह्यातील विशेषतः तरुणाईने साथ दिल्यामुळे प्रोनोग्राफी किंवा फोन करुन अश्लील व्हिडीओ बनविणे, त्याच बरोबर ऑनलाईन गंडा या सारखे प्रकार आम्ही कमी करू शकलो, असेही त्यांनी सांगितले.

सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून आज नव्याने झालेल्या अधिकार्‍यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार वर्षभरापुर्वी जिल्ह्यात अशा प्रकारचे ऑनलाईन फ्रॉड वाढले होते. तसेच तरुणाईला अडचणीत आणणार्‍या अनेक घटना घडल्या होत्या. याचे वाढते प्रमाण लक्षात घेता आम्ही सिंधुदुर्ग पोलिस म्हणून जिल्ह्यातील तरुणाईमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रत्येक महाविद्यालय आणि कॉलेजमध्ये जावून तेथील तरुणाईला जागृत करण्याचे काम केले. त्याचमुळे राज्यात अन्य ठिकाणी या प्रकाराचा आकडा वाढत आहे. परंतु सिंधुदुर्गात मात्र हे प्रकार कमी झाले आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग सायबर सेलचा मोठा वाटा आहे.

ते पुढे म्हणाले, याठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या तरुणाईच्या काळात अशा गोष्टी पासून लांब राहणे गरजेचे आहे. मोबाईल ही दुधारी तलवार आहे. त्याचा फायदा आपल्याला होवू शकतो आणि तोटाही त्यामुळे ते हत्यार योग्य पध्दतीने हाताळणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =