You are currently viewing दोडामार्ग शिवसेना महिला तालुकाप्रमुख पदी चेतना गडेकर तर शितल हरमलकर यांची शहर महिलाप्रमुख पदी नियुक्ती

दोडामार्ग शिवसेना महिला तालुकाप्रमुख पदी चेतना गडेकर तर शितल हरमलकर यांची शहर महिलाप्रमुख पदी नियुक्ती

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यात शिवसेना पक्षाची मोर्चेबांधणी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या नेतृत्वाखाली जोरदारपणे सुरू असून आज लोकसभा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक व शालेय शिक्षणमंत्री तथा स्थानिक आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते महिला आघाडीच्या प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली, यात सौ. चेतना गडेकर यांना तालुका प्रमुख (महिला) तर सौ. शितल हरमलकर यांना शहरप्रमुख म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दोन्ही नियुक्ती मिळालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, राजेंद्र निंबाळकर, प्रेमानंद देसाई, शैलेश दळवी, सानवी गवस, रामदास मेस्त्री, संदिप गवस, दयानंद धाऊस्कर, गुरुदास सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =