You are currently viewing वेंगुर्ले एस् .टी.डेपोत लवकरच भाजपा ची कामगार संघटना स्थापन होणार

वेंगुर्ले एस् .टी.डेपोत लवकरच भाजपा ची कामगार संघटना स्थापन होणार

*वेंगुर्ले एस्. टी. डेपोतील चालक – वाहक यांनी भाजपा कार्यालयात भेट देऊन केली पदाधिकाऱ्यांशी चर्चा

 

एस्. टी. कर्मचाऱ्यांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवीण्यासाठी व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच भाजपा ची कामगार संघटना वेंगुर्ले डेपोमध्ये स्थापन करावी यासाठी वेंगुर्ले डेपोतील चालक व वाहक यांनी भाजपा कार्यालयात भेट घेऊन मागणी केली .
एस्. टी.कामगारांच्या राज्यव्यापी संपकाळात भाजपा च्या वतीने आम. गोपीचंद पडळकर व आम. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी आंदोलन करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला , त्यामुळेच कर्मचाऱ्यांमध्ये भाजप पक्षाकडून अपेक्षा निर्माण झाली असल्याने सर्व कामगार भाजपाच्या झेंड्याखाली काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगीतले .
यावेळी भाजपा कार्यालयात जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर , शक्तीकेंद्र प्रमुख कमलेश गावडे , सरपंच संघटनेचे पपु परब तसेच एस्.टी.कर्मचारी भरत सिताराम चव्हाण , दाजी तळवणेकर , महादेव भगत , मनोहर वालावलकर , मिलिंद मयेकर , सखाराम सावळ , तेजस जोशी , प्रशांत गावडे , रोशन तेंडोलकर इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + six =