You are currently viewing दिगंबर गावकर यांचे गाऱ्हाणा मालवणी काव्यसंग्रह गाबित समाजासाठी अभिमान – माजी आ परशुराम उपरकर 

दिगंबर गावकर यांचे गाऱ्हाणा मालवणी काव्यसंग्रह गाबित समाजासाठी अभिमान – माजी आ परशुराम उपरकर 

देवगड

तालुक्यातील गिर्ये गावचे गबित समाज बांधव दिगंबर गावकर यांच्या गाऱ्हाणा या मालवणी काव्यसंग्रहातून खऱ्या अर्थाने आपल्या व्यथा व कथा या काव्यातून सांगण्याचा प्रयत्न या काव्यसंग्रहातून होत असताना जीवनातील व आपल्या नियमित व्यवहारातील घटना या आजच्या समाजासमोर मालवणी भाषेत मांडल्या गेल्या आहेत. खरोखरच ही बाब गाबीत समाजाला अभिमानास्पद असून गाबीत समाजाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे व यातच आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव व शिवकालात गाबीत समाजातील मावळ्यांनी केलेले स्वराज्याची सेवा ही निश्चितपणे गौरवशाली आहे कोणतेही पुस्तक जनतेसमोर जात असताना आपले मत अथवा काव्य सोप्या मालवणी भाषेत मांडण्याचा प्रयत्न या काव्यसंग्रहातून केला गेला आहे .असे प्रतिपादन माजी आमदार परशुराम तसा जीजी उपरकर यांनी गाऱ्हाणं या मालवणी काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी जामसंडे येथे बोलताना केले.

निशिगंधा प्रकाशन नेरूळ नवी मुंबई आयोजित दिगंबर गावकर यांच्या गाऱ्हाणा या मालवणी काव्यसंग्रहाचे प्रकाशन शुक्रवारी १० मार्च रोजी सायंकाळी ५ वा.कै.मोरेश्वर जनार्दन गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे या ठिकाणी श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेलचे मुख्याध्यापक हिराचंद तानवडे आणि माजी आमदार तथा अखिल भारतीय गाबित समाज महासंघ अध्यक्ष परशुराम उपरकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले .यावेळी व्यासपीठावर प्रभाकर गावकर नगराध्यक्ष साक्षी प्रभू ,लक्ष्मण गावकर, गाबितत समाज जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, महाराष्ट्र गाबीत समाज अध्यक्ष सुजय धुरत कवी दिगंबर गावकर सौ वृषाली गावकर लक्ष्मण गावकर उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.या निमित्ताने,शामसुंदर गावकर,सुजय धुरत, लक्ष्मण गावकर,
सौ .,वृषाली गावकर,प्रभाकर गावकर,डॉ रघुनाथ पोकळे यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.नगराध्यक्षा साक्षी प्रभू शिवसेना विभागप्रमुख संदीप डोळकर यांनीही शुभेच्छा दिल्या.
काव्यसंग्रहाचे कवी दिगंबर गावकर म्हणाले,आपल्या गुरुजनांनी घडविले त्यातून वाचन केले आणि मालवणीचे वेड लागून मालवणी गाऱ्हाण हा काव्यसंग्रह निर्माण केला.या प्रवासात अनेक व्यक्ती येतात भेटतात निघून जातात परंतु त्यांच्या आठवणी प्रेरणा देतात असे सांगितले. राकेश गावकर यांनी सूत्रसंचालन करीत असताना तोंडाची चव हे दिगंबर गावकर यांचे काव्य वाचन केले .चंद्रशेखर उपरकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
मुख्याध्यापक हिराचंद तानवडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात,कवी दिगंबर गावकर हे पडेल हायस्कुलचे विद्यार्थी असून त्यांच्या मुळे शाळेचा गौरव होत आहे ते भाग्य आपणास लाभले.आपल्या शाळेतून गुरुजनाकडून मिळालेली शिदोरी त्याचा उपयोग करून या विदयार्थी कवींनी आपले जीवन समृद्ध केले आणि आज नामवंत कवींच्या रांगेत कवी दिगंबर गावकर बसले ही बाबही आम्हाला आमच्या शाळेला भूषणावह आहेअसे सांगून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
या निमित्ताने अनेक मान्यवरांनी कवी दिगंबर गावकर याना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 2 =