You are currently viewing आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या वतीने रविवार दि. 27 ऑगस्ट 2023 रोजी धर्मसंस्कार सोहळ्याचे आयोजन

आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या वतीने रविवार दि. 27 ऑगस्ट 2023 रोजी धर्मसंस्कार सोहळ्याचे आयोजन

सावंतवाडी:

 

आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या वतीने रविवार दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी श्री देवी माऊली मंदिर येथे संध्याकाळी 7.00 वाजता *धर्म संस्कार सोहळ्याचे* आयोजन करण्यात आलेले आहे.

संस्कार’म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. ‘गुणांचा गुणाकार’ याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि ‘दोषांचा भागाकार’ याचा अर्थ स्वतःमधील दोष अल्प करायचे. धर्म शिक्षणातून सुसंस्कारी व्यक्तिमत्व घडविण्यासाठी, नव्या पिढीला आजच्या तरुणाईला व्याख्यानाच्या माध्यमातून धर्म संस्कार ज्ञात करण्यासाठी *धर्मसंस्कार* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुसंस्कार घेऊन बाहेर पडणारी तरुण पिढी आज महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता वाईट प्रवृत्तींना बळी पडून वाईट मार्गाला जाते त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, भविष्याच्या दृष्टीने चांगले विचार, आचार व्याख्यानातून कानावर पडावेत आणि सुसंस्कारी पिढी निर्माण व्हावी असा या कार्यक्रमाचा मूळ हेतू आहे. या कार्यक्रमासाठी व्याख्याते *श्री.लक्ष्मीकांत कराड*, शिवशंभो व्याख्याते *प्राध्यापक श्री.रुपेश पाटील*, तरुण भारतचे उपसंपादक *श्री प्रवीण मांजरेकर* तसेच लेखक व कवी *श्री दीपक पटेकर* हे उपस्थित राहणार आहेत.

त्याचप्रमाणे याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी आरोस गावात दुचाकी गाड्यांची चोरी करणाऱ्या चोरांचा पाठलाग करत मोठ्या शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या गावातील युवक *संदेश देऊलकर* आणि *योगेश देऊलकर* या बंधूंचा सत्कार करण्यात येणार आहे. असेच समाजोपयोगी कार्य करण्यास इतरांना देखील प्रेरणा मिळावी असा या सत्कार सोहळ्याचा उद्देश आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी मंडळा तर्फे विनंती आहे.

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा