You are currently viewing सोनाळी येथे वणव्याने रस्त्यावर कोसळले झाड

सोनाळी येथे वणव्याने रस्त्यावर कोसळले झाड

वैभववाडी – उंबर्डे मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प

वैभववाडी

अज्ञाताने लावलेल्या वनव्यात सोनाळी नजीक आकेशियाचे झाड रस्त्यात उन्मळून पडले. यामुळे वैभववाडी – उंबर्डे मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. संबंधित विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने कटर मशीन च्या साह्याने झाड बाजूला केले. त्यानंतर मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.
शनिवारी सायंकाळी सोनाळी नजीक रस्त्यालगत वणवा लागला होता. या वनव्यात आकेशियाचे झाड बांबूच्या बेटीसहित रस्त्यावर आडवे झाले. झाडाने संपूर्ण रस्ता वेढल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मौदे व जांभवडे कडे जाणाऱ्या बस ही अडकल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. सार्वजनिक बांधकाम चे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने झाड बाजूला करण्यात आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. या मार्गावर अजून काही झाडे धोकादायक आहेत. ती कोणत्याही क्षणि कोसळण्याच्या स्थितीत आहेत. अशी धोकादायक झाडे तोडण्याची मागणी प्रवासी व ग्रामस्थांमधून केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 7 =