You are currently viewing कुडाळ भाजप महिला मोर्चाच्या महोत्सवात “फुल्ल टू जल्लोष”!!

कुडाळ भाजप महिला मोर्चाच्या महोत्सवात “फुल्ल टू जल्लोष”!!

कुडाळ :

 

ढोलताशांचा गजर, आकर्षक वेशभूषा, पाककलेत साकारलेल्या खाद्यपदार्थांचा घमघमाट, उखाण्यात घेतलेली पतिराजांची नावं आणि एकाहून एक सरस नृत्याविष्कार अशा जल्लोषी वातावरणात भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा कुडाळ, यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला महिला महोत्सव अविस्मरणीय ठरला.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला महोत्सवाचे आयोजन कुडाळ भाजपा कार्यालया समोरील भव्य पटांगणात करण्यात आले होते. ८ मार्च रोजी जिल्हा बँकेच्या संचालिका सौ नीताताई राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी झालेल्या रस्सीखेच स्पर्धेत महिलांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला तो कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील झुंजार महिला ग्रुप यांनी तर दुसरा क्रमांक मिळाला महापुरुष महिला मंडळ खालची कुंभारवाडी कुडाळ शहर यांना. उत्तेजनार्थ पारितोषिक वेंगुर्लेकर वाडी कुडाळ शहर यांनी पटकावले.

9 मार्च रोजी सौ शर्वरी विश्वास मुंडले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिध्द विधीतज्ञ ऍड संग्राम देसाई साहेब यांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आले. त्यांनी सर्वांना महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यादिवशीही महिलांनी मोठ्या संख्येने विविध स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांचे बक्षीस वितरण त्यांच्या ऍड देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

महिलांसाठी खास आकर्षण ठरलेला “खेळ पैठणीचा” उत्स्फूर्तपणे संपन्न झाला त्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला ते कुडाळ शहरातील कुंभार वाडी इथली सौ पूनम धर्मेंद्र सुतार यांनी तर द्वितीय क्रमांक पटकावला सांगिरडेवाडीच्या वैष्णवी विष्णू परब यांनी तर तुतिय क्रमांक मिळवला कुंभारवाडी ह्या ठिकाणच्या शवी संतोष कुंभार यांनी.

लकी ड्रॉ मध्ये रोहिणी मेस्त्री यांना प्रथम, विघ्नेश विक्रांत कामत द्वितीय आणि गायत्री परब यांना तृतीय क्रमांक मिळाला. पाककला स्पर्धेत सौ अपर्णा पोटफोडे प्रथम, सौ नेहा कडोलकर यांनी द्वितीय आणि सौ संजना परब यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

कार्यक्रमाचे निवेदन नागेश नेमळेकर यांनी आपल्या बहारदार शैलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. उत्साहपूर्ण वातावरणात महिलांनी या दिनाची मजा लुटली.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध विधी तज्ञ ऍड. संग्राम देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. दीपलक्ष्मी पडते, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ संध्या तेरसे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालिका नीता राणे, जेष्ठ नेत्या अस्मिता बांदेकर, माजी नगरसेविका जेष्ठ उषा आठले, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, जिल्हा कार्यकरणी सदस्य आनंद शिरवलकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा पदाधिकारी बंड्या सावंत, ओरोस मंडल ता अध्यक्ष दादा साईल, सरचिटणीस विजयी कांबळी, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीपाद तवटे, नगरसेवक गटनेते विलास कुडाळकर, कुडाळ भाजपचे शहराध्यक्ष राकेश कांदे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, शहराध्यक्ष ममता धुरी, नगरसेविका नयना मांजरेकर, कु. चांदणी कांबळी, नगरसेवक अभिषेक गावडे, ऍड राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, सोशल मीडिया अध्यक्ष राजवीर पाटील, ऍड रीना पडते, माजी नगरसेविका अश्विनी गावडे, साक्षी सावंत, प्रज्ञा राणे, कुडाळ महिला मंडल अध्यक्ष आरती पाटील, महिला मोर्चाच्या अदिती सावंत, रेखा काणेकर, पिंगुळी महिला मोर्चा अध्यक्षा सौ साधना माडये, चेतन धुरी, राजेश पडते, राकेश नेमलेकर, कु. सखू आकेरकर, प्राची आठले, तेजस्वी वैद्य, रचना नेरुरकर, मुक्ती परब, ममता कुंभार, विशाखा कुलकर्णी, ओरोस सुप्रिया वालावकर, अक्षता कुडाळकर, कु. गायत्री पडते, कु. श्वेता पेडणेकर युवा मोर्चाचे विश्वास पांगुळ, स्वरूप वाळके, आदी भाजपा महिला मोर्चाच्या भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 6 =