You are currently viewing कात्रादेवी मार्गावर मोटरसायकल अपघातात युवक ठार

कात्रादेवी मार्गावर मोटरसायकल अपघातात युवक ठार

देवगड
कात्रादेवी मार्गावर मोटरसायकल स्लीप होवून झालेल्या अपघातात सागवे येथील ताबिश तालिब काझी(२२) हा युवक ठार झाला आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी ६.३० सुमारास झाला.

याबाबत दिलेल्या माहितीनूसार, ताबिश तालिब काझी हा मंगळवारी सकाळी सागवे कात्रादेवी मार्गावरून मोटरसायकलने घरी जात असताना सागवे हमदारेवाडी येथे मोटरसायकल स्लीप होवून झालेल्या अपघातात त्याचा डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्याला नागरिकांनी उपचारासाठी देवगड ग्रामीण रूग्णालयात आणले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला. अपघाताची खबर मोहिद्दीन अली काझी यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − 3 =