You are currently viewing उठा उठा दिवाळी आली..

उठा उठा दिवाळी आली..

भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या तयारीत..

मोती साबणची जाहिरात टीव्हीवर आली की लगेच लक्षात येतं, दिवाळी जवळ आली. परंतु तोच मोती साबण उटण्याचा सोबत घरपोच झाला की देणारा माणूस पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागला हे चटकन दिसून येतं. गेली अनेक वर्षे आपल्या मतदारसंघात गणपती, दिवाळी आली की साखर, तेल, साबण, उटणे वाटण्याची पद्धत रूढ झाली आहे. त्याचबरोबर वाटणाऱ्यांना नावे ठेवण्याची किंवा सणासुदीलाच दिसतात म्हणून कुचेष्टेने बोलण्यातही येत असतं. अलीकडे निवडून गेलेले मतदारांना विसरले, परंतु भावी नगरसेवक म्हणून उभे राहण्याच्या तयारीत असणारे मात्र घराघरात पोहचू लागले आहेत.
सावंतवाडी भाजपचे नवे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे हे सर्वोदय नगर परिसरात राहतात. प्रभाग ८ मध्ये येणाऱ्या या भागात अजय गोंदावळे यांनी मोती साबण, उटणे, आणि जासमिन तेलाची बाटली असणारे पाकीट दिवाळीची भेट म्हणून स्वतःच्या नावाच्या लेबलसहित घरोघरी वाटप केले. भाजपचे शहर अध्यक्ष असतानाही उर्वरित शहर वगळून फक्त सर्वोदय नगर परिसरात अजय गोंदावळे यांच्याकडून अचानक झालेल्या वाटपामुळे लोकांमध्ये उलटसुलट चर्चा होताना दिसत आहे. सर्वोदय नगर परिसरातून भविष्यात नगरसेवक म्हणून निवडणुकीत उडी घेण्यासाठीच अजय गोंदावळे आधीपासूनच तयारीला लागल्याची सुद्धा चर्चा नाक्यांनाक्यांवर होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 7 =