बेकायदा गुटखा व तंबाखु वाहतूक प्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन

बेकायदा गुटखा व तंबाखु वाहतूक प्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन

आरोपीतर्फे वकील श्री.बी.बी.रणशूर यांनी पाहिले काम.

इन्सुली ता.सावंतवाडी येथे दिनांक 4 मार्च 2021 रोजी वाहनांची तपासणी करताना बांदा पोलिसांनी गोव्यावरून येणारा आयशर टेम्पो क्र. MH12-SX / 2388 ची थांबवून तपासणी केली असता त्यातून बेकायदेशीर गुटखा व तंबाखूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले होते. सदर प्रकरणी बांदा पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी, सिंधुदुर्ग यांना माहिती दिली होती. त्याप्रमाणे अन्न सुरक्षा अधिकारी श्री.पवार यांनी बांदा पोलिस स्टेशनमध्ये वरील प्रकरणी बेकायदा बंदी असलेला माल साठा व वाहतूक प्रकरणी फिर्याद दिली होती. सदरची फिर्याद अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 3(1) (zz), 26 (2), 27, 30(2)(A), 26(2)(4), 59 तसेच भादवी कलम 188, 272, 273, 328 अन्वये दाखल केली होती. याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी सुनावणी होऊन आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. आरोपी तर्फे वकील श्री.बाळाजी बाबुराव रणशूर यांनी काम पाहिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उपरोक्त आयशर टेम्पो मधून होत असलेली बेकायदा बंदी असलेली विमल पान मसाल्याची 4160 पाकिटे, किंमत सुमारे 499200/- व V-1 तंबाखूची 4160 पाकिटे, किंमत सुमारे 124800/- रुपयांचा माल सापडून आला होता. सदरचा आयशर टेम्पो लक्ष्मण दिवानजी भोरडे चालवीत होता व सोबत सुधाकर कल्याण पानसरे (दोन्ही रा. शिवरे, ता.भोर, जि. पुणे) हा होता. सदरचे दोन्ही आरोपी पोलिसांनी मालासहित ताब्यात घेतले होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार यातील तिसरा आरोपी अर्जदार दिनेश कल्याण पानसरे यांच्या ताब्यात सदरचा टेम्पो होता व ज्या व्यक्तीने गोवा येथे सदरचा माल भरला त्या व्यक्तीशी प्रस्तुत दिनेश यांचे 42 वेळा संभाषण झाले होते. याचा विचार करून पोलिसांनी दिनेश पानसरे याचा सदर गुन्ह्याशी संबंध असल्याचा निष्कर्ष काढत त्याला पकडण्याचा पोलिसांचा हेतू होता. प्रस्तुत दिनेश पानसरे यांनी आपल्या वकिलांमार्फत जिल्हा सत्र न्यायालयात बांदा पोलिसांनी सदर गुन्ह्याकामी आपल्यास अटक करू नये म्हणून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
जिल्हा न्यायालयात बचाव करताना दिनेश पानसरे च्या वकिलांनी न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की, सदरचे वाहन हे 25/02/21 च्या कराराप्रमाणे सुधाकर पानसरे यांना विकलेले होते, त्यामुळे 4/3/21 रोजी घडलेल्या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. सदर अर्जाची सुनावणी सत्र न्यायालयासमोर होऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.आर.बी. रोठे साहेबांनी आरोपीतर्फे झालेला युक्तिवाद मान्य करून आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपी तर्फे वकील श्री.बाळाजी बाबुराव रणशूर यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा