You are currently viewing सावंतवाडीत शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी…

सावंतवाडीत शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी…

सावंतवाडी

येथील शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराजांच्या प्रतिमेसह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा महिला संघटक ॲड. नीता कविटकर, माजी नगरसेविका अनारोजिन लोबो, भारती मोरे, दिपाली सावंत, स्वप्ना नाटेकर, विश्वास घाग, परशुराम चलवाडी, एकनाथ हळदणकर, बापू कोठावळे, शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे,भारती परब, साधना मोरे, पूजा नाईक, सीमा सोनटक्के, नीलिमा चलवाडी,मनीषा परब, लक्ष्मी मेस्त्री, पुनम जामसंडेकर, सत्वशीला कुपवडेकर, सायली होडावडेकर, सुवर्णा गाड, लतिका सिंग, विद्या सावंत आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा