You are currently viewing उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथील अपुऱ्या मिळणाऱ्या वैद्यकीय सोईसुविधा शिरोडा पंचक्रोशीतील नागरिकांना मिळाव्यात याकरिता करण्यात येणारे बेमुदत आत्मक्लेश उपोषण मागे – रिमा मेस्त्री भाभ्रनिसं, महिला जिल्हाध्यक्ष

उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथील अपुऱ्या मिळणाऱ्या वैद्यकीय सोईसुविधा शिरोडा पंचक्रोशीतील नागरिकांना मिळाव्यात याकरिता करण्यात येणारे बेमुदत आत्मक्लेश उपोषण मागे – रिमा मेस्त्री भाभ्रनिसं, महिला जिल्हाध्यक्ष

वेंगुर्ला तहसीलदार प्रविण लोकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व वैद्यकीय अधीक्षक, शिरोडा उपजिल्हा रुग्णालय डॉ. प्रविण देसाई यांचे उपोषणकर्त्यांनी मानले आभार- राजन रेडकर

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सतर्क पोलीस टाईम्स व मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा येथे शिरोडा पंचक्रोशीतील नागरिकांना कोरोना काळात मिळत असलेल्या अपुऱ्या वैद्यकीय सोईसुविधा तात्काळ मान्य करून मिळाव्यात याकरिता तहसीलदार कार्यालय, वेंगुर्ला येथे दिनांक २ जून रोजी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून बेमुदत आत्मक्लेश उपोषण करण्यात येणार होते. संस्थेने केलेल्या निवेदनातील प्रमूख मागण्या सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रविण देसाई यांनी लेखीपत्र देऊन मान्य करण्यात आल्याने दिनांक २ जून रोजीच्या बेमुदत आत्मक्लेश उपोषण मागे घेण्यात आल्याचे संस्थेचे कोकण विभाग सीईओ राजन रेडकर यांनी दिल्याची माहिती संस्थेची महिला जिल्हाध्यक्ष व आरवली ग्रामपंचायत उपसरपंच रिमा मेस्त्री यांनी दिली.
संस्थेने कोरोना काळात अपुऱ्या वैद्यकीय सोईसुविधांमुळे नागरिक त्रस्त झाले होते, त्यामुळे उद्भवलेल्या वैद्यकीय समस्या दूर व्हाव्यात याकरिता जनहितार्थ करण्यात येणारे बेमुदत उपोषणातील मागण्या मान्य केल्याने वेंगुर्ला तहसीलदार प्रविण लोकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रविण देसाई यांचे संस्थेच्या वतीने तसेच शिरोडा पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आल्याची माहिती राजन रेडकर यांनी दिली.
भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या जिल्हा आरोग्य विभागाने मान्य केल्याने शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ प्रविण देसाई यांच्याकडून मागण्या मान्य केलेले पत्र स्वीकारण्यात आले त्याप्रसंगी राजन रेडकर, विकास सारंग, राजाराम चिपकर, जगन्नाथ राणे, बाळा जाधव, विनय मेस्त्री, रीमा मेस्त्री, नारायण मेस्त्री, राजेश सातोसकर उपस्थित होते.
त्याचप्रमाणे शिरोडा ग्रामपंचायत सरपंच मनोज उगवेकर, विजय बागकर, केशव नवाते, भूषण मांजरेकर, सौरभ नागोळकर, आशिष सुभेदार, देवेंद्र वस्त, अरुण कांबळी, रविंद्र राणे, मुरलीधर राऊळ, दिलीप साळगावकर, प्रविण भगत, विनायक वारखंडकर, सौ लक्षणा परुळेकर, सौ. प्रियांका मेस्त्री, अखिल रुद्रे, नंदू चिपकर, हर्ष परूळेकर यांनी जिल्हा आरोग्य विभागाने उपजिल्हा शिरोडा रुग्णालयाच्या वैद्यकीय मागण्या मान्य केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + five =