You are currently viewing कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासाचे तिकीट दर पूर्ववत करा….

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासाचे तिकीट दर पूर्ववत करा….

परशुराम उपरकर यांची रेल्वे बोर्डाकडे मागणी : २० टक्के जादा दराची आकारणी

कणकवली

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांच्या तिकीट दरात २० टक्के जादा आकारणी होत आहे. ही ज्यादा आकार मी कमी करून तिकीट दर पूर्ववत करावेत अशी मागणी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी रेल्वे बोर्डाकडे केली आहे
कोविड १९ काळात ०११११ मुंबईवरुन गोव्याकडे जाणारी गाडी त्याचप्रमाणे गोवा-मडगावहुन मुंबईकडे जाणारी ०१११२ ही गाडी कोविड काळात स्पेशल ट्रेन चालवण्यात आली. या गाडीला स्लिपर क्लास, थ्री- टायर एसी, टु-टायर एसी व फस्ट क्लास या तिकिटामध्ये सुमारे २० टक्के जादा आकारणी केली जात आहे.
या बाबत श्री उपरकर यांनी निवेदनात म्हटले आहे, कोकणकन्याच्या वेळेत धावणारी व त्या गाडीचे क्रमांक पूर्वीप्रमाणे असुनही स्पेशल ट्रेन म्हणुन चालवली जात आहे. व त्याची तिकिटावरची आकारणी सुमारे २० टक्के जादा केली जात आहे. ही आकारणी प्रवाशांना परवडणारी नाही. सध्या मुंबईतील लोकल ट्रेन १ फेब्रुवारीपासुन सर्व सामान्यांना सुरु केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कोकण रेल्वेवर धावणाऱ्या गाड्या बऱ्याचशा नियमित सुरु केलेल्या असुन ज्या कोकणकन्या गाडीला पर्यटकांप्रमाणे स्थानिक प्रवाशांची जादा मागणी असते. त्या कोकणकन्या ट्रेनला जादा आकारणी केली जात आहे. ती आकारणी तातडीने रद्द करुन या गाडीला नियमित गाडी सुरु करुन जादा आकारणी बंद करण्यात यावी. कारण, कोविड काळात निर्बंध घातलेले केंद्र सरकार, राज्यसरकारने बहुतांशी निर्बंध उठवलेले असुन, कोकण रेल्वेनेही कोकणकन्या गाड़ी मुंबईला जाणारी व मुंबईवरुन येणारी गाडी नियमित सुरु करुन प्रवाशांकडुन पूर्वीप्रमाणे नियमित भाडे आकारण्यात यावे. त्याचप्रमाणे अन्य गाड्या जादा चालवल्या जातात, त्या गाड्यांचेही प्रवासी भाडे नियमित करुन चालवण्यात याव्यात अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी रेल्वे बोर्डाकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + six =