परदेशी शिक्षणाचे प्रवेशद्वार दाखविणारे राहुल नाईक
सिंधुदुर्ग – कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील राहुल श्रीनिवास नाईक या युवा उद्योजकाने जिल्ह्यातील मुलांना युरोपात शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी सहा वर्षांपूर्वी ‘Edubroad Education and Career Guidance Centre – बर्लिन’ या नावाने स्वतःची संस्था सुरु केली. युरोपमधल्या देशातील विविध अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या भारतीय मुलांसाठी ही संस्था काम करते. भारतीय विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी निवडून देणे, योग्य कोर्स निवडणे, व्हिसा करणे, युरोपमध्ये राहण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन करणे अशी विविध कामे या संस्थेमार्फत केली जातात. जर्मन आणि फ्रेंच भाषा बोलायचे क्लासेसही सुरू केले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना इथे कसलीच अडचण येणार नाही. हे क्लासेस ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत राहुल नाईक हे स्वतः गेली 15 वर्षे बर्लिन (जर्मनी) येथे राहत आहेत. त्यांनी स्वतः ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मास्टर्सची डिग्री येथे संपादित केली आणि नोकरी सुरु झाली.
युरोपात आल्यावर विद्यार्थ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच इथे शिकायला येताना
असंख्य गोष्टींची परिपूर्णता करण्याची गरज असते आणि त्यासाठी अचूक मार्गदर्शनच उपयोगी पडते. जर हे नीट झाले नाही तर विद्यार्थी हतबल होऊन जातो. परक्या देशात कुणी मदत देखील करत नाही. आपल्या बांधवांना अशी कुठलीच अडचण होऊ नये, या विचाराने राहुल यांनी स्वतःची संस्था सुरू केली आणि आजपर्यंत हजारो विद्यार्थी त्यांच्या संस्थेमार्फत यूरोपमधल्या विविध देशां आनंदाने उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांची संस्था फक्त उच्च शिक्षणच नाही, तर उच्चशिक्षित मुलांना यूरोपमधल्या देशातील अनेक संस्थांमध्ये जॉब देण्याचे कामही करते.
राहुल जेव्हा जर्मनी येथे शिक्षण घेण्यास आले, तेव्हा प्रत्यक्षात काय समस्या येतात, हे त्यांच्या चांगलेच लक्षात आले. तसे इतर मुलांना त्रास होऊ नयेत, हा संकल्प मनात धरून त्यांनी ही संस्था सुरू केली. अशा प्रकारच्या करिअर मार्गदर्शन करणाऱ्या संस्था भारतात पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमधून अनेक ठिकाणी सुरू आहेत; पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांना मार्गदर्शन मिळावे व येथील मुले-मुली देखील युरोपमध्ये शिक्षण घेण्यास यावेत, म्हणून त्यांनी दोन वर्षांपूर्वी आपली सिंधुदुर्ग शाखा सुरू केली. त्या आधी त्यांची कोल्हापूर येथील शाखाही कार्यरत आहे. आता लिहायला अतिशय अभिमान आहे की, आपल्या जिल्ह्यातील १५ पेक्षा जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ‘एनरोल’ होऊन जर्मनीमध्ये उच्च शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष आणि जिव्हाळा आपल्या घरापासून खूप दूर येऊन मिळतोय. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे पूर्ण लक्ष दिले जाते. त्यांना काही अडचणी येत नाहीत ना, याकडे राहुल स्वतः लक्ष देतात. एवढ्यावरच न थांबता त्यांनी जर्मन आणि फ्रेंच भाषा बोलायचे क्लासेस सुरू केले आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना इथे कसलीच सुरू अडचण येणार नाही. हे क्लासेस ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत आणि ‘लॅग्वेज ट्रेनिंग’चे काम राहुल यांची पत्नी श्रुती करते. दर्जेदार शिक्षण, सांस्कृतिक समृद्धी आणि वाढीव करिअरच्या संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परदेशातील शिक्षण हा एक परिवर्तनकारी अनुभव म्हणून उदयास आला आहे. जगभरातील विद्यापीठे विविध अभ्यासक्रम आणि अत्याधुनिक संशोधन संधी देत असल्याने, परदेशात शिक्षण घेणे हे अनेक इच्छुक विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे.
युनायटेड स्टेट्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि जर्मनीसारखे देश आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च गंतव्यस्थानांमध्ये स्थान देतात. तथापि, या संस्थांना अर्ज करताना प्रमाणित चाचणी, व्हिसा अर्ज, आर्थिक नियोजन आणि अभ्यासक्रमाच्या पूर्वतयारी समजून घेणे यासारख्या अडथळ्यांचा समावेश होता.
■ करिअर समुपदेशन : योग्य अभ्यासक्रम आणि संस्थांची शिफारस करण्यासाठी अर्जदारांच्या (विद्यार्थ्यांच्या) आवडी, सामर्थ्य आणि दीर्घकालीन करिअर ध्येयांचे मूल्यांकन करतो.
■ अर्ज साहाय्य : आकर्षक वैयक्तिक विधाने तयार करण्यापासून ते सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्याची खात्री करण्यापर्यंत ते अर्ज प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यात मदत करतात.
■ व्हिसा सपोर्ट : गरजा समजून घेणे आणि व्हिसा मुलाखतीची तयारी करणे कठीण असू शकते आणि सल्लागार गंभीर मार्गदर्शन करतात.
■ आर्थिक सल्ला : आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या परदेशातील अभ्यासासाठी शिष्यवृत्ती, आर्थिक मदत आणि बजेट एक्सप्लोर करण्यात मदत करतो.
■ प्री-डिपार्चर ओरिएंटेशन : आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या यजमान देशांमध्ये सांस्कृतिक रुपांतर, निवास आणि नेटवर्किंग
■ संधींसाठी तयार करतो.
■ आगमनानंबर समर्थन आम्ही प्रवासाचे समन्वय साधतो, विमानतळांवर पिकअप करतो आणि त्यांच्या निवडलेल्या गंतव्यस्थानावरील संपूर्ण सेटलिंग टप्प्यात त्यांना साइटवरील प्रशासकीय बाबी, जसे की बँक खाते उघडणे किंवा अधिकाऱ्यांकडे नोंदणी करणे, आरोग्य विमा काढणे, सिम कार्ड आदी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, edubroad आकांक्षांचे वास्तवात रुपांतर करू शकते, संधींच्या जगात दारे उघडू शकते. आम्ही दरवर्षी मास्टर्ससाठी ५० पेक्षा जास्त विद्यार्थी, अंडरग्रॅज्युएटसाठी २५ पेक्षा जास्त विद्यार्थी आणि नोकऱ्यांसाठी सुमारे ७५ उमेदवार आणतो.