You are currently viewing केंद्र सरकार मार्फत कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या जन औषधांचा लाभ घ्या – डॉ.सई धुरी

केंद्र सरकार मार्फत कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या जन औषधांचा लाभ घ्या – डॉ.सई धुरी

केंद्र सरकार मार्फत कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या जन औषधांचा लाभ घ्या – डॉ.सई धुरी

सिंधुदुर्गनगरी

मधमेह, उच्‍च रक्‍तदाब, कर्करोग इत्‍यादी आजारामध्‍ये रुग्‍णास आपले आरोग्‍य चांगले ठेवण्‍यासाठी आणि पुढील गुंतागुंत टाळण्‍यासाठी नियमीतपणे औषधे घेणे अपरिहार्य आहे.पण औषधांच्या किंमतीत दिवसेदिवस वाढ होत आहे. अशावेळी सर्वसामान्‍य जनतेस कमी किंमतीमध्‍ये  चांगली गुणवत्‍तापूर्ण औषधे मिळाल्‍यास तो रुग्‍ण उपचारात नियमीतता ठेवतो. त्यासाठी केंद्र सरकार मार्फत कमी कमतीत जन औषधे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याचा लाभ घ्यावा,  असे आवाहन  डॉ.सई धुरी यांनी केले.

            प्राथमिक आरोग्‍य केंद्र कसाल येथे जन औषधी दिवस  साजरा करण्‍यात आला. या ची सुरुवात सुरुवात जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.सई रुपेश धुरी यांच्या हस्ते दीप प्रज्‍वलन करुन करण्यात आली .

            डॉ. धुरी म्हणाल्या, सद्या औषधांच्‍या ही योजना केंद्र सरकार मार्फत राबविली जात असुन औषधे WHO-GMP प्रमाणीत असुन औषधची गुणवत्‍ता NABL च्‍या मान्‍यताप्राप्‍त प्रयोगशाळेतून केली जात असल्‍याने गुणवत्‍तापूर्ण आहे. उपस्थित जनतेची  वैद्यकीय तपासणी करुन त्‍यात आढळून आलेल्‍या मधुमेह, उच्‍चरक्‍तदाब रुगणाना एका महिन्‍याची औषधी मोफत पुरविण्‍यात आली .सद्यस्‍थीतीत ही औषधे प्रत्‍येक प्राथमिक आरोग्‍य केंद्र स्‍तरावर पुरेशा प्रमाणात उपलब्‍ध असुन ती सर्वाना मोफत पुरविली जात आहेत. औषधे जास्‍त प्रमाणात आवश्‍यक असतील तर ती कमी दरात आणि गुणवत्‍तापूर्ण उपलब्‍ध होण्‍यासाठी प्रत्‍येक गावात जन औषधी केंद्रे सुरु करण्‍याचा शासनाचा मानस आहे.

            जन औषधी बाबत जनमानसात प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. जन औषधी  स्‍वस्‍त पण चांगली पण असल्‍याने रुग्‍णाचे आरोग्‍य चांगले रहाण्‍याबरोबर आर्थिक बचतपण होते. यासाठी आज उपस्थित प्रत्‍येकाने जन औषधी बाबत जनमानसात प्रचार आणि प्रसार करण्‍याचे आवाहन डॉ.धुरी यांनी केले. यावेळी जिल्‍हा स्‍तरावरील अधिकारी आणि कर्मचारी इतर मान्‍यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा