You are currently viewing देवबाग राऊळवाडीत परप्रांतीय कामगाराची गळफास घेत आत्महत्या…

देवबाग राऊळवाडीत परप्रांतीय कामगाराची गळफास घेत आत्महत्या…

मालवण

रंगकाम करणाऱ्या राकेशकुमार शिवराम ( वय- २३ मूळ रा. ता. हरीया, उत्तरप्रदेश) याने देवबाग राऊळवाडी येथे राहत असलेल्या मांगरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेची खबर अच्युत मायबा यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली.
राकेशकुमार हा रंगकाम करायचा. देवबाग येथील पाटील यांच्याकडे तो सध्या काम करत होता. राकेशकुमार याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष शिवगण हे अधिक तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − twelve =