You are currently viewing सिंधुदुर्गात ठाकरे गटात खांदेपालट

सिंधुदुर्गात ठाकरे गटात खांदेपालट

उद्धव ठाकरे शिवसेनेत अतुल रावराणे यांचा वरचष्मा..

तीन विधानसभा मतदारसंघात तीन जिल्हाप्रमुख

 

मुंबई :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत खांदेपालट करण्यात आले आहेत. आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हयातील तीन विधानसभा मतदारसंघात तीन जिल्हा प्रमुख असणार आहेत.

कणकवली विधानसभा मतदार संघ सतिश सावंत, कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ संजय पडते, तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संदेश पारकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच जिल्हा सहसंपर्कप्रमुख म्हणून अतुल रावराणे यांची निवड करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा