देवगडमधील भाजप कार्यकर्त्यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश…

देवगडमधील भाजप कार्यकर्त्यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश…

कणकवली

देवगड तालुक्यातील सात ते आठ गावामधील भाजपाचे शेकडो कार्यकर्ते यांचा शिवसेनेत जाहिर पक्षप्रवेश उद्या शुक्रवार दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वा. कुणकेश्वर सडा येथील वैजयंती व्हीला येथे होणार आहे. यावेळी शेकडो कार्यकर्ते शिवबंधन बांधणार असल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली.
खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँके अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. यावेळी देवगड संपर्कप्रमुख राजु फाटक, सतिश मोतलींग, उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलींद साटम आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
देवगड तालुक्यातील मुनगे, हिंदळे, मिठमुंबरी, कुणकेश्वर, तांबळडेग, कातवण गावातील कार्यकर्ते तसेच रापण संघाचे सदस्य आदींचा हा भव्य प्रवेश सोहळा होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कामकाज पद्धतीवर विश्वास ठेऊन हे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहणार असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा