You are currently viewing विकास विद्यालय सडूरे अरुळे शाळेचे निवृत्त शिक्षक मारुती श्रीपती कणसे यांचे वृध्दापकाळाने निधन

विकास विद्यालय सडूरे अरुळे शाळेचे निवृत्त शिक्षक मारुती श्रीपती कणसे यांचे वृध्दापकाळाने निधन

वैभववाडी

विकास विद्यालय सडूरे अरुळे शाळेचे निवृत्त शिक्षक मारुती श्रीपती कणसे वय 83 यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्यांचे मूळ गाव पन्हाळा तालुक्यातील सातवे हे आहे. ग्रामविकास शिक्षण परिषद कोल्हापूर या संस्थेत त्यांनी जवळपास 32 वर्षे क्रीडा शिक्षक पदावर काम केले होते. त्यांची संपूर्ण सेवा माध्यमिक विद्यालय करुळ व विकास विद्यालय सडूरे- अरुळे याठिकाणी झाली. सडूरे याठिकाणी ते सेवानिवृत्त झाले होते. कडक शिस्तीचे क्रीडा शिक्षक म्हणून ते सर्वांच्या परिचित होते. त्यांच्या निधनाने माजी विद्यार्थ्यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + one =