You are currently viewing शेर्ले येथे कापडी पिशव्या तयार करण्याच्या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

शेर्ले येथे कापडी पिशव्या तयार करण्याच्या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

बांदा

शेर्ले ग्रामपंचायत व महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शेर्ले येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पर्यावरणपुरक कापडी पिशव्या तयार करणे’ या प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील ५० हुन अधिक युवती व महिलांनी या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला होता.

टाकाऊपासून टिकावू या संकल्पनेतून कापडी कपड्यांपासून विविध प्रकारच्या पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण युवती व महिलांना यावेळी प्रशिक्षकांकडून देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या युवती व महिलांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शेर्लेचे सरपंच उदय धुरी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, प्रकल्प अधिकारी संजय देसाई, प्रशिक्षक प्रकाश पाटील तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करणेसाठी संस्था अध्यक्ष विजयसिंह भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − one =