You are currently viewing जागतिक महिला दिनानिमित्त रेडी गावातळे वाडीत महिलांसाठी रक्ततपासणी शिबीराचे आयोजन

जागतिक महिला दिनानिमित्त रेडी गावातळे वाडीत महिलांसाठी रक्ततपासणी शिबीराचे आयोजन

रेडी (वेंगुर्ला)

आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी उपसरपंच नामदेव राणे यांच्या संकल्पनेतून गावतळे वाडी महिला मंडळ यांनी आज गावतळे गोळतुवाडी महिलांसाठी रक्ततपासणी शिबिराचे आयोजन केले.यावेळी गावतळे गोळतुवाडी च्या महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.

दरवर्षी गावतळेवाडीतील महिला मंडळ महिला दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवीत असतात. वैद्यकीय महिला अधिकारी डॉ. अन्नू बल्हारा यांनी यावेळी महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोलाचे मार्गदर्शन देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी या गावतळे वाडीतील सुपुत्र सन्मा. रामसिंग राणे हे पुन्हा एकदा थेट सरपंच पदी निवडून आले म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्त्री शक्ती चा सन्मान म्हणून रेडी प्राथमिक केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. अन्नू बल्हारा यांचा ही सत्कार करण्यात आला तसेच रेडी गावतळे प्राथमिक शाळेत 4 वर्षे अतिशय प्रामाणिक सेवा दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सन्मा. शिंदे सर यांचाही गावतळे महिला मंडळा च्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच सौ स्नेहा साळगांवकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन केले.

यावेळी रेडी ग्रा. सरपंच सन्मा. रामसिंग राणे. रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी सन्मा. डॉ.अन्नू बल्हारा, रेडी गावचे माजी उपसरपंच श्री नामदेव राणे, समुदाय आरोग्य अधिकारी सन्मा. अंकिता तोरसकर, शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर, परिचारिका ज्योती कदम , दीपाली नाईक, दर्पणा मांजरेकर, कांबळी, अंगणवाडी सेविका प्रांजल राणे, अनुसया राणे , दिव्या राणे, तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 5 =