You are currently viewing प्रिंटर्स असोसिएशनचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा

प्रिंटर्स असोसिएशनचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा

प्रिंटर्स असोसिएशनचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा

इचलकरंजी : प्रतिनिधी

मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांचा जन्मदिन जागतिक मुद्रण दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून प्रिंटर्स असोसिएशन, इचलकरंजी या संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांचा कौटुंबिक स्नेहमेळावा व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला

या मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी विकास खरात व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार बाळासाहेब आंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रिंटर्स असोसिएशनच्या वतीने
मुद्रण व्यवसायातील योगदानासाठी दिला जाणारा मानाचा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी प्रकाश ऑफसेटचे

अरूणराव खंजिरे यांना प्रदान करण्यात आला. तसेच शहरातील नामांकित कॅलिग्राफर पद्मकांत मुसळे यांच्या ‘माझी अक्षरे’ या सुंदर हस्ताक्षर पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुणे बाळासाहेब आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुद्रणक्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा विशेष गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचा उद्देश प्रिंटर्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव साळी यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सांगितला. पाहुण्यांची ओळख उपाध्यक्ष सिताराम शिंदे व प्रमुख मान्यवरांचा
सत्कार असोसिएशनचे सचिव संजय निकम यांच्या हस्ते करण्यात आला.
जुन्या लेटरप्रेसमधून ते आजच्या आधुनिकतेची गरज ओळखून ऑफसेट व पॅकेजिंग क्षेत्रात प्रकाश ऑफसेट आज भक्कमपणे उभे आहे ते काळाबरोबर बदलत गेल्यामुळेच. मुद्रण क्षेत्रात आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत, घरच्यांकडून हा पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे, असे भावनिक उद्गार तसेच इचलकरंजी जशी वस्त्रनगरी आहे तशी प्रिंटनगरी व्हावी ,अशी सदिच्छा जीवनगौरव पुरस्कारप्राप्त अरूण खंजिरे यांनी व्यक्त केली.
मुद्रक हितासाठी अनेक वर्षे बाळासाहेब आंबेकर यांचे योगदान संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. वयाच्या ७९ व्या वर्षीसुध्दा ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मुद्रकांना संघटीत करतानाच त्यांच्या नव्या – हक्कासाठी कार्यरत आहेत.या कार्याचा उचित गौरव म्हणून
प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजी या संघटनेच्या
वतीने महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांना गौरवपत्र प्रदान करुन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बाळासाहेब आंबेकर
म्हणाले , की , प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजी ही संघटना अत्यंत उल्लेखनीय काम करत असल्याचे समाधान आहे.
मुद्रकांची एकता आणि अखंडता ही कायमस्वरुपी टिकली पाहिजे. नविन तंत्रज्ञानामुळे प्रिंटींग व्यवसाय कमी होत असला तरी मुद्रकांनी निराश न होता, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे व काळाबरोबर चालले पाहिजे.

यावेळी झालेल्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये आलेल्या मुद्रक परिवारासाठी फनी गेम्स्, आकर्षक वेषभूषा, प्रश्नमंजूषा आणि पैठणीचा खेळ असे विविध मनोंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. स्पर्धांचे परिक्षण माजी सल्लागार पद्माकर तेलसिंगे व सौ. प्रियंका जाधव यांनी केले. मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे संयोजन बंटी जैन व नरेंद्र हरवंदे यांनी केले. कौटुंबिक सोहळ्यासाठी इचलकरंजी आणि परिसरातील बहुसंख्य मुद्रक आणि त्यांचा परिवार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नेटके नियोजन इव्हेंट चेअरमन विनोद मद्यापगोळ यांनी केले. सुत्रसंचालन दिपक वस्त्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी खजिनदार कलगोंडा पाटील, संचालक गणेश वरूटे, राकेश रूग्गे, सुधाकर बडवे, दिपक फाटक, रणजीत पाटील, सल्लागार दिनेश कुलकर्णी, संतराम चौगुले शंकरराव हेरवाडे, संजय आगलावे यांनी परिश्रम घेतले. आभार स्वप्निल नायकवडे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − three =