वैभववाडीत पोलिसासह पंचायत समिती कर्मचारी पॉझिटिव्ह…

रुग्णांची संख्या ५२ वर;तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची ” हाफ सेंचुरी “…

वैभववाडी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आता कोकणात अधिकच विळखा घट्ट घातला आहे. वैभववाडी तालुक्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून रुग्ण संख्येने अर्ध शतक पार केले आहे. त्यामुळे तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी वैभववाडी पोलिस ठाण्यातील एक पोलिस शिपाई तर पंचायत समिती कार्यालयातील एक शिपाई कोरोना पाॕझिटीव्ह झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना पाॕझिटीव्ह रुग्णांची संख्या 52 झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा