You are currently viewing कोकणातील- रत्नागिरीची होळी

कोकणातील- रत्नागिरीची होळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम लेख*

*कोकणातील- रत्नागिरीची* *होळी*

होळीचे दिवस, परीक्षांचे दिवस आणि कैऱ्यांचे दिवस या तिन्ही गोष्टी रत्नागिरीच्या आठवणींची निगडित आहेत!लहानपणी मार्च महिना आला की घरात अभ्यासाचे पडघम वाजायला घरात सुरुवात व्हायची आणि अभ्यासाबरोबर कैरीचे तुकडे तिखट मीठ घालून खाण्याची आमची सुरुवात असायची! कोकणात होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्यामुळे मुंबईचे चाकरमाने या दिवसात सुट्टी घेऊन कोकणात यायचे. मग खरी होळीच्या उत्सवाची मजा सुरू व्हायची! रोज रात्री अंगणात खेळे यायचे!’खेळे’ म्हणजे वेगवेगळे नाच करणारे ठराविक लोक असायचे.ते काही शास्त्रशुद्ध नाच नसायचे पण पारंपारिक गीतांबरोबरच नवीन नवीन सिनेमातले तसेच कोळी गीते, शेतकरी गीते यावर आधारित नाचायचे. त्यात उत्साह व जोश इतका असे की ते बघायला वाड्यातील सर्व लोक उत्सुकतेने उत्साहाने गोळा व्हायचे. तेव्हा टीव्ही नव्हता त्यामुळे ही जिवंत उत्साहाची करमणूक सर्वांनाच फार आवडायची. या सगळ्या सांस्कृतिक होळीच्या काळात पुरणाची पोळी लज्जत आणत असे ती वेगळीच!
होळीच्या खुंटावर होळी उभी करण्यात येत असे आणि भैरीचे पालखी पाच दिवस असे दरवर्षी एखाद्याच्या बागेतील माडाचे झाड होळीसाठी निवडले जाईल ते तोडून त्या ठिकाणाहून वाजत गाजत होळीच्या ठिकाणी आणले जाईल मुख्य म्हणजे ते माणसे वाहून आणत असेल त्यामुळे त्यासाठी चार-पाच तास लागत असत आमच्या घरापासून जवळच होळीचा खुंट असल्याने आम्ही दुपारपासूनच ते बघण्यात दंग असायचो. एकदा का होळी उभी राहिली की चार-पाच दिवस तिथे जत्रा असे. रोज देवीची पालखी मंदिरापासून मिरवणुकीने येई तेव्हा खूपच गर्दी उसळत असे. होळीच्या खुंटावर उभे राहणाऱ्या होळीसाठी सुरमाडा चा उपयोग केला जातो. हा सुरमाड जिथे असेल तिथे देवीची पालखी जाते आणि मिरवणुकीने होळीच्या सुरमाडाबरोबरच खुंटावर येते. रोज दुपारी आणि रात्री वाजत गाजत देवीची पालखी मंदिरापासून खुंटा पर्यंत येते. कोकणात सगळीकडे होळीचा उत्सव थोड्या बहुत प्रमाणात असाच असतो. काही ठिकाणी होळी लहान असते, पण उत्साह तेवढा जास्तच असतो!
पाच दिवस देवीच्या पालखीचे असतात. देवीची पालखी उठली तरी होळी मात्र पंधरा दिवस उभी असते. पाडव्याला ती होळी उतरवतात. लोकांनी नवसाचे म्हणून बांधलेले अगणित नारळ असतात. होळी खाली आली की ते प्रसादाचे नारळ घेण्यासाठी झुंबड उडते. दरवर्षी लोक श्रद्धेने देवीकडे मागणे मागत असतात,तिचा कौल मिळाला की ते काम होते असे मनापासून वाटत असते. मग ते काम झाले की पुढच्या वर्षी नारळाची तोरणे बांधली जातात!
होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी येते .
मुलांच्या आवडीचा हा सण विविध रंगाचे पाणी उडवून साजरा होतो. पुढे येणाऱ्या उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी ही सगळी तयारी असते. थंड पन्हं, कैरीची डाळ, लोणचं यांचे स्वाद येऊ लागतात. देशावर धुळवड साजरी केली जाते, पण कोकणात मात्र रंगपंचमीची मजा जास्त येते! परीक्षा तोंडावर आलेली असते. पण अभ्यासाबरोबरच हे रंगीबेरंगी दिवसही मनाला खूप आनंद देतात. रत्नागिरीची आणि कोकणातील होळी अशीच माझ्या डोळ्यासमोर येते. इतकी वर्षे झाली, काळ बदलला पण सणवार, प्रथा आहे तशाच आहेत! काळानुसार त्यात थोडे बदल झाले असतीलही, पण ती पालखी, होळीचा खुंट, तो लोकांचा उत्साह हे सगळं तसंच असणार आहे! पुन्हा एकदा मनाने मी रत्नागिरी फिरून आले. तेथील होळी सणाला अनुभवायचा योग पुन्हा कधी येतो पाहूया!

उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
9975892602

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

प्रतिक्रिया व्यक्त करा