You are currently viewing साळगाव युवासेना पुरस्कृत लूभाटवाडी प्रिमिअम लिग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कृष्णा धुरी यांच्या हस्ते संपन्न 

साळगाव युवासेना पुरस्कृत लूभाटवाडी प्रिमिअम लिग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कृष्णा धुरी यांच्या हस्ते संपन्न 

कुडाळ

साळगाव युवासेना पुरस्कृत लूभाटवाडी प्रिमिअम लिग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उपतालुकाप्रमुख श्री कृष्णा धुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

साळगाव शिवसेना युवासेना यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ग्रामपंचायत सदस्या सौ तृप्ती सावंत सौ मानसी धुरी कुमारी सिद्धी मेस्त्री यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून मैदानात कृष्णा धुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी उपविभाग प्रमुख हंसराज सावंत, डॉ मेस्त्री, बंड्या कोरगावकर, युवासेनेचे रोहित सावंत,चेतन सावंत,प्रमोद सावंत, मिलिंद सावंत,जोशी,बाळा पावसकर, राकेश धुरी, मंगेश शेर्लेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा