You are currently viewing संभाजी मांजरेकर यांनी नागरिकांना सेवा देण्यासाठी काम केले” – डॉ. जितेंद्र जाधव वरिष्ठ वैद्यकीय आरोग्य अधिकारी

संभाजी मांजरेकर यांनी नागरिकांना सेवा देण्यासाठी काम केले” – डॉ. जितेंद्र जाधव वरिष्ठ वैद्यकीय आरोग्य अधिकारी

“संभाजी मांजरेकर यांनी नागरिकांना सेवा देण्यासाठी काम केले” – डॉ. जितेंद्र जाधव वरिष्ठ वैद्यकीय आरोग्य अधिकारी

मुंबई – मनपा ही मुंबईतील अग्रण्य सरकारी संस्था म्हणून सर्वत्र परिचित असून त्या दुष्टीकोनातून पाहिले जाते. दरम्यान इथे शिपाई ते आयुक्तांपर्यत सर्वांकडे आधाराने सर्वजण पाहत असतात.त्यापैकी एक आजचे सत्कारमूर्ती संभाजी तुळशीराम मांजरेकर आहेत. त्यांनी नागरिकांना सेवा देण्यासाठी काम केले असे नमूद करून मुंबईमध्ये गिरगाव, घाटकोपर आदी ठिकाणी मराठी बाणा जपला जातोय पण मांजरेकर यांनी ठाण्यात असूनही तो जपलाय असल्याचे वरिष्ठ वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ जितेंद्र जाधव यांनी सेवापूर्ती निमित्ताने आयोजित समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. या प्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ मनोज माने, सौ. संजना मांजरेकर, डॉ विलास मोहकर , माजी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक बाबू डोईफोडे आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कारादाखल वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक पूर्व उपनगरे संभाजी मांजरेकर यांनी या देशातील महत्त्वाच्या स्वायत्त संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. त्यातही आरोग्य विभाग मिळाल्याने पूर्णपणे समाधानी असून त्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो असे सूचित केले. यावेळी माजी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक बाबू डोईफोडे , समाज विकास अधिकारी बाजीराव खैरनार, डॉ विलास मोहकर, राजेंद्र झेंडे, शेखर कनाळकर, प्रदिप काळे , रवींद्र साळवी, शिवराम केळजी, गोसावी आदींनी संभाजी मांजरेकर यांच्या ३८ वर्षे पंचवीस दिवस या कालावधीतील घालविलेल्या आठवणींना उजाळा दिला. यानिमित्ताने स्वच्छता निरीक्षक नित्यानंद पाटील आणि सहकारी यांच्या बहारदार संगीत मैफलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पडवळ यांनी मार्मिक शब्दांत केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 1 =