बॅ. नाथ पै महिला व रात्र महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनीचा इंद्रधनू मेणबत्ती तयार करण्याचा स्तुत्य उपक्रम ‌‌….

बॅ. नाथ पै महिला व रात्र महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनीचा इंद्रधनू मेणबत्ती तयार करण्याचा स्तुत्य उपक्रम ‌‌….

कुडाळ :

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कलाकौशल्य निर्माण व्हावे, आपल्यातील कला कौशल्याचा वापर व्यावसायिक वृद्धीसाठी, व अर्थार्जना साठी करावा या उद्देशाने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महिला आणि रात्र महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी कलात्मक रंगीत मेणबत्ती तयार करून त्या घाऊक व किरकोळ स्वरूपात विकण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियाना व स्किल डेव्हलपमेंट ऑफ इंडिया या उपक्रमाअंतर्गत बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, महिला विकास कक्ष व उद्योजकता विकास कक्ष यांच्या पुढाकाराने लोकडॉऊन काळात काही विद्यार्थी व शिक्षक यांच्या मदतीने मेणबत्ती तयार करण्याचा लघु उद्योग सुरू करण्यात आला असून त्याची घाऊक व किरकोळ स्वरूपात विक्रीही सुरू झाली आहे. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या शुभहस्ते व युवा परिवर्तन चे दत्तात्रय परुळेकर व दीपक कुडाळकर, प्रा.परेश धावडे, सौ. मधुरा इंन्सुलकर प्रिया केटगाळे, प्रीतम वालावलकर व शिक्षक- विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्राचार्य अरुण मर्गज, संस्था सल्लागार प्रा. चेतन प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रसाद कानडे, प्रीतम वालावलकर प्रणित पालव, योगेश येरम शिक्षकांच्या मदतीने बॅरिस्टर नाथ पै शैक्षणिक भवनात इंद्रधनू नावाच्या मेणबत्ती बनविण्याचा लघुउद्योग विद्यार्थ्यांनी सुरू केला आहे रंगीत व कलात्मक व दीर्घकाळ पेटणाऱ्या, टिकाऊ स्वरूपाच्या मेणबत्त्या तयार करून त्या किरकोळ व घाऊक स्वरुपात व माफक किंमतीत विकण्यात येत असून त्या पैशाचा उपयोग विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविण्यासाठी केला जाणार आहे. यासाठी बत्तीस विद्यार्थ्यांनी मेणबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण युवा परिवर्तन या संस्थेच्या मदतीने पूर्ण केलेले आहे. या मेणबत्त्या महाविद्यालयांमध्ये विक्रिसाठी उपलब्ध आहेत. तरी गरजूंनी, व्यापारी व ग्राहकानी पुढील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे करण्यात येत आले आहे.
संपर्क क्रमांक – प्रा. अरुण मर्गज – 942330 2859, प्रसाद कानडे – 7875161598, योगेश येरम – 9404438533

प्रतिक्रिया व्यक्त करा