You are currently viewing आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून भडगावात ४० लाखांची विकास कामे मंजूर

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून भडगावात ४० लाखांची विकास कामे मंजूर

मठ कुडाळ पणदूर घोटगे गारगोटी रा. मा. १७९ रस्त्यासाठी १ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर..

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत विकास कामांची भूमिपूजन व उदघाटने संपन्न…

BSNL टॉवरच्या कामाची आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी

भडगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आल्यापासून गेल्या पाच वर्षात भडगाव गावात विकासाची गंगा अवतरित झाली आहे. आमदार निधी, खासदार निधी, जिल्हा वार्षिक योजना, २५१५ योजना, जनसुविधा, क वर्ग यात्रास्थळ विकास, डोंगरी विकास योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून लाखो रुपयांची विकासकामे आमदार वैभवजी नाईक, खासदार विनायकजी राऊत, पालकमंत्री उदयजी सामंत, माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून मार्गी लागलेली आहेत.


भडगाव ब्राम्हणवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, भडगाव खुर्द देऊळवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, भडगाव बुद्रुक गिरोबा मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, भडगाव बुद्रुक डिगाळवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, भडगाव बुद्रुक टेंबवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, भडगाव खुर्द व बुद्रुक येथे मुख्य रस्त्यालगत स्ट्रीट लाईट, भडगाव खुर्द देऊळ वाडी येथे संरक्षण भिंत, भडगाव बुद्रुक कृष्णा घाडी यांच्या घरालगत संरक्षण भिंत, ग्रामपंचायत कार्यालय सभागृह व सुशोभीकरण, भडगाव खुर्द राजाराम सावंत यांच्या घरासमोर कॉजवे, भडगाव खुर्द मधलीवाडी येथे गणेश घाट, जि प शाळेसमोर प्रवेशद्वार, अंगणवाडी इमारत, भडगाव बुद्रुक गायरलवाडी रस्ता, भडगाव खुर्द लिंगेश्वर मंदिर येथे स्मशान शेड बांधणी अशा प्रकारची अनेक कामे शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षात करण्यात आलेली आहेत. काही कामे मंजूर आहेत व काही प्रस्तावित आहेत.
२०२१-२२ या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या भडगाव खुर्द देऊळवाडी येथे संरक्षण भिंत, भडगाव खुर्द ब्राम्हणवाडी उर्वरित रस्ता खडीकरण डांबरीकरण, भडगाव खुर्द मधलीवाडी लिंगेश्वर मंदिर जाणारी पायवाट, भडगाव बुद्रुक धुळशेलवाडी साकव दुरुस्ती, भडगाव बुद्रुक कृष्णा घाडी यांच्या घरा लगत संरक्षण भिंत बांधकाम, भडगाव खुर्द देऊळवाडी जनार्दन गुरव यांच्या घरालगत संरक्षण भिंत बांधकाम तसेच विशेष पुरहाणी दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत १ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेल्या मठ कुडाळ पणदूर घोटगे गारगोटी रा. मा. १७९ रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामांची भूमिपूजन व उदघाटन आमदार मा. वैभवजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आली तसेच अनेक वर्षांची मागणी असलेला BSNL टॉवर खासदार मा. विनायकजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून भडगाव ग्रामपंचायत येथे उभारला जात आहे या कामाची आमदार वैभवजी नाईक यांनी पाहणी केली.


याप्रसंगी भडगाव गावाच्या विकासासाठी नेहमीच कार्यरत असणारे श्री हितेशजी सावंत, सरपंच सौ प्रणिता गुरव, उपसरपंच श्री तुळशीदास गुरव, ग्रा. प सदस्या प्रिया गुरव, ग्रा. प. सदस्या स्नेहल नाईक, गावप्रमुख हिराजी गुरव, प्रमोद लोट, शाखाप्रमुख राजू लोट, हेरंब सामंत, ग्रामसेविका सौ पालव, राजू गवंडे, बाबा अंब्रे, अरुण माळकर, भरत गुरव, श्रीनिवास नाईक, कृष्णा घाडी, अरविंद बागवे, दिगंबर कदम, रविचंद सावंत, ताता सावंत, राजाराम गुरव, निलेश गुरव, जनार्दन गुरव, पंढरी लाड, दाजी गुरव, कृष्णा गुरव, अंकुश गुरव, धोंडी कदम, नाना कदम, अनंत कदम, सिताराम गुरव, अनिल सावंत, राजू गुरव, किरण गुरव, जयश्री गुरव, सुहास गुरव, अशोक गुरव, विठ्ठल गुरव, लवू गुरव, राजू मुंज, नंदू तावडे, पांडुरंग लोट, लक्ष्मण सावंत, बबन गुरव, पंडित गुरव, आबा गुरव, बाबी सावंत, बाबू नार्वेकर, भास्कर लोट, समीर लोट, जनार्दन चव्हाण, सोनू शिंदे, गुरुनाथ सामंत तसेच इतर अनेक शिवसेना कार्यकर्ते, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा