You are currently viewing ‘स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल’ व ‘वाॅव किड्स रायन प्री स्कूल’, सावंतवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम जल्लोषात

‘स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल’ व ‘वाॅव किड्स रायन प्री स्कूल’, सावंतवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम जल्लोषात

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल व वाॅव किड्स रायन स्कूल, सावंतवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल – कोलगाव, सावंतवाडी येथील शाळा परिसरात दिनांक २८ फेब्रुवारी २०२३, या दिवशी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला दीपप्रजवलनाने सुरुवात करण्यात आली. शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व सौ. काश्मिरा पाटणकर तसेच, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत , शाळेचे प्रमुख पाहुणे वरिष्ठ शैक्षणिक व्यवसायाची परंपरा पुढे चालवणारे व या क्षेत्रात २३ वर्षे अनुभव असलेले ‘अर्नवाज बस्तवाला’ व वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञ ‘श्रीमती कृत्तिका ‘ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेचा संपूर्ण वार्षिक अहवाल व संगीत वाद्याने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम गणेशवंदना नृत्य सादर करण्यात आले. स्नेहसंमेलनाच्या या कार्यक्रमात मराठी संस्कृती जपण्यावर भर दिला गेला व आपल्या महाराष्ट्रातील मराठी संस्कृती जपणारी अशी अप्रतिम नृत्य स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी मधील इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी रंगमंचावर सादर केली. यामध्ये, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे गणेश वंदना नृत्य, धनगरी नृत्य, जय जय महाराष्ट्र, वारी नृत्य , कोळी नृत्य, जोगवा, लावणी, राज्याभिषेक अशी महाराष्ट्रातील मराठी संस्कृती जपणारी नृत्ये सादर केली. तसेच, वाॅव किड्स रायन प्री स्कूल मधील विद्यार्थ्यांनी ‘इंद्रधनुष्य’ या त्यांच्या नृत्याच्या थीमला अनुसरून त्याला शोभेल असे विविध नृत्ये जसे की , उंदीर मामा आयलो, कलर थिम, सेल्फि ले ले ले , चिकन कुकडू कू , मल्हारी, डान्स का भूत, मोबाईल थिम, नाचो नाचो, कोरोना डान्स शंकराही नृत्य सादर केली. यानंतर कोरोना काळातील जे योद्धे होते जसे की, डॉक्टर, नर्स, ज्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी निर्जंतुकीकरण केले व ऑक्सिजन सीलेंडर पुरवठा करणारे, रुग्णवाहिनी चालक यांचे मनःपूर्वक स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरणानंतर झाल्यानंतर वाव किड्स रायन प्री स्कूलच्या व स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील नृत्य सादर केले, तर वाव किड्स रायन स्कूल मधील पालकांनी फॅशन शो उपक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. यानंतर शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभारप्रदर्शनाने व ‘वंदे मातरम्’ हे भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून शेवटी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा