वरवडे-बौद्धवाडीतील पहिली ते बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…..

वरवडे बौद्धवाडीमधील पहिली ते बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मधुकर वरवडेकर यांच्या घरी सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मधुकर वरवडेकर यांच्या हस्ते गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम या थोर विचारवंतांची आत्मचरित्रे देण्यात आली.

मधुकर वरवडेकर म्हणाले की, ज्या प्रतिकूल परिस्थितीतून मुलांनी हे यश संपादन केले आहे, त्या मुलांच्या सुप्तगुणांना चालना देण्यासाठी व त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा देण्यासाठी हा सत्कार करण्यात आला आहे. मुलांनी चांगले शिक्षण घेऊन शिक्षणाच्या उत्तुंग शिखरावर आरूढ होऊन राष्ट्राची जडणघडण व प्रगती करावी, अशी अपेक्षा यावेळी वरवडेकर यांनी व्यक्त केली.

त्यावेळी तेथे उपस्थित सिद्धार्थ वरवडेकर व सुरेश जाधव यांनीही मुलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास रविकांत वरवडेकर, रुपेश वायंगणकर व वाडीमधील इतरांचे ही सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा