You are currently viewing जागतिक महिला दिनानिमित्त इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी महिला विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक महिला दिनानिमित्त इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी महिला विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन

कुडाळ :

जागतिक महिला दिनानिमित्त इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी महिला सेलच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खालील प्रकारच्या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

*मोफत आरोग्य तपासणी शिबीर*– दि.26 फेब्रुवारी 2023 रोजी पिंगुळी येथील जिव्हाळा सेवाश्रम येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर. वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत

*पोस्टर मेकिंग स्पर्धा*-

दिनांक 6 मार्च 2023 रोजी सर्वांसाठी खुल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्थळ बॅ.नाथ पै शिक्षण संस्था कुडाळ, वेळ सकाळी दहा ते बारा

*होळी महोत्सव*-

दि. 8 मार्च रोजी होळी महोत्सवा निमित्त सकाळी मुलांसाठी विशेष कार्यक्रम.. विशेष शाळा *जीवदान स्पेशल स्कूल झाराप* येथे आयोजन करण्यात आलेले आहे .

तर याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी महिला सेलच्या सिंधुदुर्ग सह समन्वयक/ पदाधिकारी डॉ प्रगती शेटकर, डॉ शरावती शेट्टी, डॉ चैताली प्रभू यांनी केले आहे .

अधिक माहितीसाठी डॉ. शरावती शेट्टी – ७२०८१७११९०, डॉ. प्रगती शेटकर – ९०२२४३५५७९ नंबर वर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा