You are currently viewing मराठी

मराठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलकार श्री.जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना*

*मराठी*

सोन्यासमान आहे बावनकशी मराठी..
बनवा सनंग काही त्या चमकवी मराठी!

ओव्या अभंग गाणी भारूड गवळणीही,
ठेक्यात लावणीला बघ नाचवी मराठी!

कादंबरी कथेचा विस्तार तो कराया,
सरसावते लगोलग मित्रापरी मराठी!

ती पाहुणी गझल अन् तो हायकू विदेशी,
झालेत धन्य दोन्ही त्या वाढवी मराठी!

जोपासते खुषीने बोलीस वेगळाल्या,
घ्याया कुशीत आम्हा सरसावली मराठी!

जयराम धोंगडे, नांदेड
९४ २२ ५५ ३३ ६९

प्रतिक्रिया व्यक्त करा