You are currently viewing घाडीगांवकर वधू – वर परिचय मेळावा 26 रोजी 

घाडीगांवकर वधू – वर परिचय मेळावा 26 रोजी 

घाडीगांवकर वधू – वर परिचय मेळावा 26 रोजी

मुंबई :

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई या संस्थेच्या आणि घाडीगांवकर वधुवर सुचक मंडळाच्या वतीने रविवार, दिनांक २६.०२.२०२३ रोजी सायंकाळी ठिक ४ ते ७ यावेळेत घाडीगांवकर वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय बिल्डिंग, शारदा टाॅकिज शेजारी, दादर पूर्व येथे केले आहे. हे मेळाव्याचे १८ वे वर्ष असुन समाजातील उपवर युवा युवतींनी या संधीचा फायदा घ्यावा. घाडीगांवकर वधुवर परिचय मेळाव्यामध्ये प्रत्यक्ष रित्या चर्चा सत्रांकरिता व्यासपीठ दिले जाते. समाजातील नोंदणीकृत व इच्छुक तरुण तरुणींनी यावेळी उपस्थित रहावे, हि नम्र विनंती आहे. संस्थेच्या काळाचौकी येथील मध्यवर्ती कार्यालयात दर मंगळवार व बुधवार सायंकाळी ठिक ५ ते ७ यावेळेत वधुवर सुचक मंडळाचे काम चालते.

अधिक माहिती साठी पुढील संपर्क आहेत :
गजानन आत्माराम घाडीगांवकर (9405371586), सरचिटणीस व वधुवर सुचक समिती प्रमुख, शशिकांत महादेव घाडीगांवकर(9869540575), रमेश शंकर घाडीगांवकर (9969547067), चंद्रकांत संभाजी घाडी (8655434899), रघुनाथ घाडीगांवकर (9869654768) व विभागीय वधुवर समिती प्रमुख.

प्रतिक्रिया व्यक्त करा