You are currently viewing बेपत्ता खलाशाचा मृतदेह देवगड खाडीत आढळला

बेपत्ता खलाशाचा मृतदेह देवगड खाडीत आढळला

बेपत्ता खलाशाचा मृतदेह देवगड खाडीत आढळला

देवगड

देवगड बंदरातील सुश्मिता सोनू चौगुले यांच्या मालकीच्या विद्या गणपत या मच्छीमारी नौकेवर एकनाथ पांडुरंग शिवगण वय ४५ राहणार मालगुंड तालुका रत्नागिरी हा खलाशी म्हणून कामाला होता २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास तो बोटीवरून खाली पाण्यात पडला त्याचा शोध घेऊनहि तो सापडून आला नाही.या संदर्भात तो नापत्ता झाल्याची तक्रार देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली होती. २३ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह देवगड खाडीत मिळाला आहे.

याबाबतची खबर त्याचा भाऊ संतोष शिवगण याने देवगड पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार राजन जाधव, पोलीस नाईक महेंद्र महाडिक करत आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा