You are currently viewing सिंधुदुर्गातील अनुसूचित जाती जमातीतुन निवडुन आलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांंचा सत्कार

सिंधुदुर्गातील अनुसूचित जाती जमातीतुन निवडुन आलेल्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांंचा सत्कार

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने होणार सत्कार

 

वेंगुर्ला :

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्याची बैठक वेंगुर्ले भाजपा कार्यालया मध्ये घेण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील अनुसूचित जाती जमाती मधुन निवडुन आलेले सरपंच – उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, वेंगुर्ले भाजपा तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव भुपेश चेदंवनकर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत आसोलकर, जिल्हा सरचिटणीस गुरुप्रसाद चव्हाण, जिल्हा सदस्य वासुदेव (बंटी)वासुदेव जाधव, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, वेंगुर्ले ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नाडिस, रविंद्र शिरसाठ मान्यवर म्हणून उपस्थित होते .

यावेळी शेर्ले (सावंतवाडी) सरपंच प्रांजल प्रशांत जाधव, आसोली (वेंगुर्ले) सरपंच बाळा मधुकर जाधव, तरंदळे (कणकवली) सरपंच सुशिल विजय कदम, जानवली (कणकवली) सरपंच अजीत सखाराम पवार, खानोली (वेंगुर्ले) सरपंच प्रणाली धनंजय खानोलकर, केसरी (सावंतवाडी) सरपंच स्नेहल गुरुनाथ कासले या सरपंचांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले गुणाजी वासुदेव जाधव (कुडाळ – तेर्सेबाबार्डे), गुरूनाथ शंकर कासले (केसरी – सावंतवाडी), प्रकाश वासुखदेव कदम (दोडामार्ग साटेली भेडशी), सौ.सोनिया उमेश मठकर (मठ – वेंगुर्ले), सौ.स्नेहल पालकर (पाल – वेंगुर्ले), सौ.वर्षा बाबुराव आडेलकर (आडेली – वेंगुर्ले), श्री. सुनिलदत्त जाधव (तरदंळे – कणकवली), भिकाजी महादेव कदम (सांगेली – सावंतवाडी), गुरुप्रसाद चव्हाण (म्हापण – वेंगुर्ले) यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर प्रसन्ना देसाई जिल्हा सरचिटणीस – भाजप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व उपस्थित सर्व कार्यकर्त्यांकडून *सरल अँप* डाऊनलोड करुन घेतले. चंद्रकांत जाधव यांनी भाजप पक्षाचे सघंटन व धन्यवाद मोदीजी अभियान अंतर्गत प्रत्येक मंडला मध्ये १२० घरी जाऊन धन्यवाद मोदीजीं ची पत्रे लिहून घेणे, तसेच डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांंची १४ एप्रिल रोजी जंयती भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग यांच्या वतीने साजरी करणे, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा “*मन कि बात*” कार्यक्रम पहाणे इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले .

*अभिनंदन ठराव*     

आजच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त व गुढीपाढवा निमित्त राज्यातील १.६३ कोटी जनतेला १०० रुपयात ” आनंदाचा शिधा ” देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याबद्दल अन्न नागरी पुरवठा मंत्री व सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

आजची जिल्हा कार्यकरणी चांगले प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात झाली.. जिल्हा पदाधिकारी व मंडल अध्यक्ष कार्यकर्ते महिला सरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या बैठकी मध्ये अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी भाजप पक्षाचे सघंटन चांगले प्रकारे होण्यासाठी नवीन जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची नावे जाहीर केली व त्यांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग सचिव भुपेश चेदंवनकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सावंतवाडी आंबोली मंडंल अध्यक्ष गुरूनाथ कासले यांची नियुक्ती करण्यात आली..वेंगुर्ले मंडल अध्यक्ष बाळा मधुकर जाधव व सचिव महेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच दोडामार्ग मंडल अध्यक्ष प्रकाश कदम यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन जिल्हा सदस्य वासुदेव रामचंद्र जाधव यांनी केले व आभार चंदु वालावलकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा