You are currently viewing कुडाळातील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोंकण डेव्हलपमेंट या संस्थेचा विधिवत अनावरण सोहळा

कुडाळातील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोंकण डेव्हलपमेंट या संस्थेचा विधिवत अनावरण सोहळा

कुडाळ MIDC येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोंकण डेव्हलपमेंट या संस्थेचा विधिवत अनावरण सोहळा

बॅ. नाथ पै यांनी कोकणच्या विकासात अमूल्य असे योगदान दिले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कोंकणच्या विकासाचाच विचार केला. अशा या महान नेत्याचे २०२१-२२ हे जन्मशताब्दी वर्ष आणि त्याचे औचित्य साधून बॅ. नाथ पै यांच्या नावाने बॅ. नाथ पै शैक्षणिक भवन MIDC येथे बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोंकण डेव्हलपमेंट या नावाच्या संस्थेची स्थापना करण्यात आली.

सदर संस्था कोकणातील अनेक सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक कार्य करण्याच्या प्रमुख उद्देशाने समाजात कार्यरत राहील.

अशा या संस्थेचे विधिवत अनावरण मान्यवरांच्या हस्ते कुडाळ, MIDC येथील बॅ. नाथ पै शैक्षणिक भवनात गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी ठीक १२.४० वा. करण्यात येणार आहे. तरी सदर सोहळ्यास बहुसंख्य नाथ पै प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन फाउंडेशनच्या अध्यक्षा अदिती पै यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा